प्रत्येकाच्या घरात भाजी केली जाते. भाजीपाला न आवडणारा क्वचितच कोणी असेल. काही भाज्या इतक्या सामान्य असतात की, बहुतेक भाज्यांमध्ये त्यांचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, बटाटा हा त्या भाज्यांपैकी एक आहे. भारतात बटाट्याची किंमत 20 रुपये प्रति किलो ते 30 रुपये किलो आहे. अनेक वेळा भाव इतके घसरतात की, बाजारात 5 किलो बटाटा 10 रुपयांना विकायला लागतो. अन्यथा बटाटे सडण्याचीही वेळ येते.
पण असा एक बटाटा आहे. ज्याची किंमत जाणून तुम्हाला धक्का बसेल. एका देशात भारतीय चलनानुसार, हजारो रुपये किलोने बटाटा विकला जात आहे. आश्चर्याची बाब म्हणजे लोक या बटाट्याचीही खरेदीही करत आहेत.
फ्रान्सच्या बेटावर केली जाते शेती :-
तुम्ही खूप महाग भाज्या ऐकल्या असतील. पण सामान्यतः लोक बटाट्याला स्वस्त भाजी म्हणून ओळखतात. पण Ile de Noirmoutier या फ्रेंच बेटावर Le Bonnotte नावाच्या बटाट्याची लागवड केली जात आहे. केवळ 50 चौरस मीटर जमिनीवरच त्याची लागवड केली जाते, मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याची किंमत जवळपास 50 हजार रुपये आहे.
जगातील 5 महागड्या भाज्यांमध्ये समावेश
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बटाट्याच्या या जातीच्या किमतीची जगभरात चर्चा आहे. हा बटाटा बाजारात 500 युरोपेक्षा जास्त दराने विकला जात आहे. कॉन्डे नॅस्ट ट्रॅव्हल या जागतिक मीडिया कंपनीच्या मते, जगातील 5 महागड्या भाज्यांमध्ये तिचा समावेश आहे. भारतीय भाज्या आणि व्यावसायिक उत्पादने विकणाऱ्या ई-कॉमर्स वेबसाइटवरही हा बटाटा 50,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीत विकला जात आहे.
‘या’ बटाट्याचा दुर्मिळ प्रजातींमध्ये समावेश
‘या’ बटाट्याला दुर्मिळ प्रजाती मानले जाते. या बटाट्याला जगातील दुर्मिळ प्रजातींमध्येही ठेवण्यात आलं आहे. शेती करताना शेतकरी अत्यंत काळजी घेतात. ला बॉनेट बटाट्याची पेरणी करताना बटाटा अगदी हलक्या हातांनी हाताळला जातो. हा बटाटा 3 महिन्यांत तयार होतो. फेब्रुवारीमध्ये पेरणी केली जाते आणि मेमध्ये तयार होतो. बटाटा खराब होऊ नये म्हणून खोदतानाही तो काळजीपूर्वक काढावा लागतो.
आरोग्यासाठी आहे फायदेशीर..
बटाटा आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या बटाट्याची चव खारट आहे. त्यात भरपूर पोषक असतात. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचे काम करते. अनेक रोग याच्या जवळ येत नाहीत. हे प्युरी, सॅलड, सूप आणि क्रीम बनवण्यासाठी वापरले जाते.