Mahindra XUV 700 आणि Scorpio N च्या मालकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. भारतातील स्वदेशी कार उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने बाजारातून 19 हजार XUV 700 आणि Scorpio N मॉडेल परत मागवले आहेत.

कंपनीने आपल्या वेबसाईटवर पोस्ट केलेल्या नोटिसमध्ये म्हटलं आहे की, XUV 700 च्या 12,566 युनिट्स आणि स्कॉर्पिओ N च्या 6,618 युनिट्स इनसाइड बेल हाउसिंग मधील रबर बेलो टेस्टिंगसाठी या गाडयांना मागवण्यात आलं आहे. महिंद्रा अँड महिंद्राने परत मागवलेली वाहने 1 जुलै ते 11 नोव्हेंबर 2022 दरम्यान असेंबल करण्यात आली होती. कंपनीने म्हटलं आहे की, ते याबाबतीत त्यांच्या डीलर्सद्वारे सर्व ग्राहकांशी वैयक्तिक संपर्क साधणार आहे.

विनाशुल्क बदलणार पार्ट व वाहनांची करणार तपासणी..

परंतु, XUV 700 आणि Scorpio N च्या ग्राहकांना जास्त काळजी करण्याची गरज नाही, कारण महिंद्रा आपल्या ग्राहकांकडून या वाहनांची तपासणी आणि बदलीसाठी शुल्क आकारणार नाही. वाहनांची तपासणी आणि पार्ट बदलण्याची संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे मोफत असणार आहे. यासोबतच ग्राहकांना जास्त त्रास होऊ नये म्हणून वाहनांची तपासणी आणि पार्ट बदलण्याचे काम कमीत कमी वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

XUV 700 आणि Scorpio N ची बाजारात किती आहे किंमत..

भारतीय बाजारात महिंद्र स्कॉर्पिओ-N ची एक्स-शोरूम किंमत 11.99 लाख रुपये ते 23.90 लाख रुपये आहे. दुसरीकडे, XUV700 ची किंमत 13.45 लाख ते 24.95 लाख रुपये आहे. XUV 700 आणि Scorpio N व्यतिरिक्त, महिंद्राच्या SUV सेगमेंटमध्ये Scorpio Classic, Thar, XUV 300, Bolero Neo, Bolero आणि Marazzo यांचा समावेश आहे.

गेल्या काही वर्षांत महिंद्राच्या बहुतांश वाहनांच्या मागणीत प्रचंड वाढ झाली असून XUV 700 व Scorpio N ला तब्बल 24 महिन्यांचा व्हेटिंग पिरियड देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *