मॅटाडोर, टेम्पो आणि ट्रॅव्हलर सारख्या देशातील आयकॉनिक युटिलिटी व्हीकल्स बनवण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या कंपनीने अलीकडेच आपल्या लेटेस्ट वाहनांचे प्रॉडक्शन सुरू केलं आहे. फोर्स मोटर्सने जाहीर केलं आहे की, त्यांनी त्यांच्या नेक्स्ट-जेनरेशन शेयर्ड मोबॅलिटी प्लॅटफॉर्म अर्बानियाचे प्रॉडक्शन सुरू केलं आहे.
यासोबतच कंपनीने असेही सांगितले की, त्यांनी न्यू प्लॅटफॉर्मवर एकूण 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ज्यांना Urbania बद्दल माहिती नाही त्यांच्यासाठी आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनीने हे मॉडेल सर्वप्रथम 2020 ऑटो एक्सपोमध्ये मॉडर्न व्हॅन म्हणून प्रदर्शित केलं होतं. न्यू अर्बानिया ही लोकप्रिय फोर्स ट्रॅव्हलरचे प्रीमियम व्हर्जन आहे.
3 व्हीलबेसमध्ये येणार फोर्स अर्बानिया
कंपनीने आपली न्यू फोर्स अर्बानिया व्हॅन भारतात 28.99 लाख रुपयांच्या स्टार्टिग किमतीत लॉन्च केली आहे. पुढील महिन्यात ही व्हॅन डीलरशिपवर पाठवली जाणार असून त्यानंतर डिलिव्हरी सुरू होईल. नवीन फोर्स अर्बानिया तीन वेगवेगळ्या व्हीलबेसमध्ये (3,350 मिमी, 3,615 मिमी आणि 4,400 मिमी) आणि तीन वेगवेगळ्या सीटिंग कपॅसिटी (10, 13 आणि 17 सीटर) मध्ये उपलब्ध असणार आहे.
115 हॉर्सपावर जनरेट करणार इंजन
विशेष बाब म्हणजे कंपनीने या व्हॅनमध्ये मर्सिडीज बेंझमधून घेतलेले FM 2.6 CR ED TCIC डिझेल इंजिन वापरलं आहे, जे 115 HP पॉवर आणि 350 Nm टॉर्क जनरेट करते. यापूर्वी हे इंजिन कोणत्याही व्हॅनसाठी वापरलं गेलं नाही.
भारतात पहिल्यांदाच मिळणारे असे जबरदस्त फीचर्स असलेली व्हॅन..
कंपनीचा दावा आहे की, या व्हॅनमध्ये वर्ल्ड-क्लॉस फीचर्स देण्यात आले आहेत, ज्याच्या मदतीने 17 लोकांचा प्रवास आरामदायी आणि चांगला होणार यात तिळमात्र शंका नाही..
याला एरोडायनॅमिकली डिझाईन केलेली बॉडी दिली गेली आहे जी कमीत कमी रोलओव्हरसह फास्ट वेगाने देखील चांगला परफॉर्मन्स देते. त्याचा पुढचा लूक बुल ने प्रेरित आहे आणि यामध्ये डे टाइम रनिंग लाइट्स (DRL’s) देखील मिळतात. रिक्लाईनिंग सीट्स, रीडिंग लॅम्प, यूएसबी पोर्ट तसेच लाईट गाईड टेक्नॉलॉजीसह LED सिग्नेचर टेल लॅम्प यांसारखे फीचर्सही देण्यात आली आहेत. असे फीचर्स यापूर्वी कोणत्याही व्हॅनमध्ये देण्यात आली नाहीत.
इंजिन एकदम स्मूथ अन् आवाजही नाही..
व्हॅनला ट्रान्सव्हर्स स्प्रिंग्ससह स्वतंत्र फ्रंट सस्पेंशन मिळते. याशिवाय, अर्बानियामध्ये, कंपनीने टू -बॉक्स कंस्ट्रक्शन टेक्नॉलॉजीचा वापर करून इंजिन पूर्णपणे वेगळ्या पोझिशनमध्ये ठेवलं आहे. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे इंजिन एकदम स्मूथ चालतं अन् आवाजही आतमध्ये येत नाही. याशिवाय स्टीयरिंग व्हील, टिल्ट आणि टेलिस्कोपिक अँडजस्टेबल स्टीयरिंग कॉलम, एर्गोनॉमिकली डिझाइन केलेले कॉकपिट, डॅशबोर्ड माउंटेड गियर लीव्हर, बिल्ट-इन, ब्लू-टूथ, तसेच कॅमेरा इनपुट आणि रिव्हर्स पार्किंगसह 7-इंच टचस्क्रीन सारखे जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहे.
सेफ्टीतही अँडव्हान्स..
या व्हॅनमध्ये आरामासोबतच सेफ्टीचीही कंपनीने विशेष काळजी घेतली आहे. यामध्ये रोल ओव्हर प्रोटेक्शन, हिल होल्ड असिस्ट, हाय सिक्युरिटी व्हेईकल ट्रान्सपॉन्डर बेस्ड इंजिन इमोबिलायझर, मोनोकोक स्ट्रक्चर, ड्युअल एअरबॅग्ज, अँडव्हान्स ईएसपी, एबीएस आणि ईबीडी तसेच पादचाऱ्यांच्या सेफ्टीसाठी खास डिझाइन केलेले फ्रंट बंपर यांचा समावेश आहे.
फोर्स अर्बानियाचे डिटेल्स पहा..
फोर्स अर्बानिया इंजिन : मर्सिडीज बेंझचे FM 2.6 CR ED TCIC डिझेल इंजिन.
फोर्स अर्बानिया पॉवर : 115 एचपी पॉवर आणि 350 एनएम टॉर्क.
फोर्स अर्बानिया गियरबॉक्स : 4 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स.
फोर्स अर्बानिया किंमत : रु 28.99 लाख (प्रारंभिक किंमत).
फोर्स अर्बानिया व्हेरिएंट : 3 व्हेरियंट – लहान, मध्यम आणि लांब.