Take a fresh look at your lifestyle.

Gram Panchayat : आता जन्म, मृत्यू,विवाह नोंदणीसह ग्रामपंचायतचे सर्व दाखले मिळवा ऑनलाईन, पहा, स्टेप बाय स्टेप प्रोसेस..

0

विविध दाखल्यांसाठी ग्रामपंचायतीत घालाव्या लागणाऱ्या चकरा कुणालाच हव्या हव्याश्या नसतात. सरकारी काम म्हटलं कि वेळेचा अपव्यय ठरलेलाच. यावर उपाय म्हणून महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने पंचायत राज विभागाच्या माध्यमातून महा ई – ग्राम सिटीझन कनेक्ट या नावाने ॲप सुरू केले आहे. या ॲपवर ग्रामपंचायतीमध्ये मिळणारे सर्व दाखले उपलब्ध केले जाणार आहेत.

त्यामुळे सामान्य नागरिकांना आता दाखल्यांसाठी ग्रामपंचायतीचे उंबरठे झिजविण्याची गरज उरली नाही. गावातील सर्व नागरिकांच्या महत्त्वाच्या नोंदी ग्रामपंचायतीमध्येच केल्या जातात.

ग्रामपंचायतीमधून प्रामुख्याने जन्म दाखला, मृत्यू दाखला, विवाह नोंदणी दाखला, घरपट्टी, पाणीपट्टी इ. दाखले व विविध प्रकारचे उतारे उपलब्ध केले जातात. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा कारभार आता ऑनलाइन झाला आहे. त्यामुळे दाखलेसुद्धा ऑनलाईन करण्यात आले आहेत.

कसे इन्स्टॉल कराल हे ॲप ?

प्लेस्टोअवर महा ई – ग्राम सिटीझन कनेक्ट एम्पॉवरिंग महाराष्ट्र हे ॲप उपलब्ध आहे. यासाठी सर्वप्रथम गूगल प्लेस्टोअर ओपन करावे, त्यानंतर प्लेस्टोअरवरून हे ॲप आपल्या मोबाइलमध्ये इन्स्टॉल करावे. हे ॲप ग्रामविकास व पंचायत विभागाने तयार केले आहे. त्यामुळे सेक्युरिटी बाबत कसलीही चिंता बाळगण्याचे कारण नाही.

ग्रामपंचायतीचा कर सुद्धा भरता येणार!

तुम्हाला पाणीपट्टी किंवा घरपट्टीचा भरणा करण्यासाठी आता ग्रामपंचायत कार्यालयात जाण्याची गरज नाही, यासाठी तुम्ही अॅपवर उपलब्द्ध ऑप्शन सिलेक्ट करून तुमची पाणीपट्टी किंवा घरपट्टी घरबसल्या भरू शकता. यासाठी तुम्ही अँप वरील ग्रामपंचायत सिलेक्ट करून पांणीपट्टी किंवा घरपट्टी ऑप्शन वर क्लिक करून आपला मिळकत नंबर टाकणे गरजेचे आहे. अश्याप्रकारे तुम्ही या अँप द्वारे ऑनलाईन पद्धतीने घरपट्टी किंवा पाणीपट्टी भरू शकता.

कोण-कोणते दाखले मिळणार ?

ग्रामपंचायत कार्यालयाद्वारे उपलबद्ध करून दिले जाणारे सर्व दाखले तुम्ही या अँपच्या माध्यमातून प्राप्त करू शकता. जसे की, जन्म दाखला, मृत्यू दाखला, विवाह नोंदणी दाखला, दारिद्र्य रेषेखालील दाखले इ. तसेच असेसमेंट उतारे देखील या अँपच्या माध्यमातून काढता येणार आहेत.

कसे काढाल दाखले ?

ऑनलाईन दाखले काढण्यासाठी ही प्रोसिजर फॉलो करणे गरजेचे आहे, सर्वप्रथम प्लेस्टोअरवरून महा ई – ग्राम सिटीझन कनेक्ट हे ॲप डाऊनलोड करावे..

त्यावर आय डोन्ट हॅव अकाऊंट या बटनवर क्लिक करावे. त्यांनतर दुसरे पेज ओपन होईल.

त्यावर आपले नाव, गाव, आडनाव, जन्म दिनांक, मोबाइल क्रमांक, ई – मेल आयडी इत्यादी सर्व माहिती सेव्ह करावी.

तुम्ही दिलेल्या मोबाइल क्रमांकावर ओटीपी येईल. तो ओटीपी टाकून कन्फर्मवर बटनावर क्लिक करावे.

अश्याप्रकारे तुमचे अकाऊंट तयार होईल. यानंतर प्रशासनामार्फत तुम्हांला एक मेसेज येईल त्यात तुमचा मोबाइल नंबर, युजरनेम असणार आहे .

पासवर्ड देखील मेसेजनेच प्राप्त होईल. युजरनेम व पासवर्ड टाकून ॲपवर लॉगीन करावे. नंतर ग्रामपंचायत निवडून अँपवरील हव्या त्या सुविधेचा तुम्ही लाभ घेऊ शकता…

अँपबाबत आहे जागृतीचा अभाव

शासनाने तयार केलेले हे ॲप नागरिकांसाठी अतिशय फायदेशीर आणि महत्त्वाचे असले तरी या ॲपबाबत अजूनही अनेकांना माहिती नाही. त्यामुळे ॲपद्वारे उपलबद्ध करून दिलेल्या सुविधांचा लाभ घेण्यापासून नागरिक वंचित राहत आहे. त्यामुळे समाजमाध्यमांतून या अँपचा प्रसार करणे गरजेचे आहे. सामान्य नागरिकांसाठी वरदान असलेल्या या ॲपचा सर्व नागरिकांनी नक्की लाभ घेतला पाहिजे.

Leave A Reply

Your email address will not be published.