सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. प्रचाराचा जोरही वाढला आहे. वाढत्या महागाईचा विचार करता निवडणूक आयोगानेही ग्रामपंचायत निवडणुकीतील सरपंच, सदस्यांच्या खर्चाच्या मर्यादित वाढ केली आहे.
सदस्यासाठी पूर्वी असलेल्या पंचवीस हजाराच्या मर्यादित वाढ करुन ती 50 हजारापर्यंत, तर सरपंचपदाच्या उमेदवारांनाही 50 हजार ते पावणे दोन लाखापर्यंत खर्च करता येणार आहे.
राज्यात होऊ घातलेल्या 7751 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रविवारी (दि.18) मतदान होणार असून सरपंच, सदस्य, उमेदवारांना लोक ‘होऊ दे खर्च’ असेच मतदार म्हणत आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात 202 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. मतदान काहीच दिवसांवर आल्यानं प्रचाराचा जोर वाढला आहे. गावागावच थंडीतही वातावरण गरम झाले आहे. इच्छुकांनी मतदाराच्या गाठीभेटी सुरू केल्याने निवडणुकीचे वारे वाहताना दिसत आहे. उमेदवारांना चिन्हाचे वाटप झाल्यानंतर गेल्या चार पाच दिवसापासून प्रचारात रंगत वाढली आहे.
सदस्यांसह सरपंचपदासाठी उमे असलेले उमेदवार रात्रंदिवस प्रचारात दंग आहेत. ग्रामीण भागातील हॉटेल, ढाबे हाऊसफुल्ल होत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारांना खर्च करण्यासाठी निवडणूक आयोगाने मर्यादा घालून दिली असली तरी पूर्वीपेक्षा खर्चाच्या मर्यादेत दुप्पट वाढ केली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून ते निकालापर्यंत हा खर्च गृहीत धरण्यात येतो. यामुळे आयोगाने घालून दिलेल्या मवावेतच झालेला खर्च पावत्यांसह निवडणूक विभागाकडे दाखल करणे बंधनकारक आहे. निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या खर्चात वाढ केल्याने निवडणुकीत मतदारांचाही चांगलीच चांदी झाली आहे. त्यामुळे निवडणूक होत असलेल्या गावात उमेदवार मोकळ्या हाताने खर्च करताना दिसत असल्याचे चित्र आहे.
प्रत्यक्षात मर्यादेपेक्षा अधिक खर्च निवडणूक कोणतीही असो ग्रामपंचायत विधानसभा अथवा लोकसभेची निवडणुकीत होणारा खर्च सर्वचजण उघड्या डोळ्यांनी पाहतात. निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या खर्चाची मर्यादा हे केवळ कागदापुरतेच मर्यादित राहते. प्रत्यक्षात मात्र मर्यादिच्या दहापटीपेक्षाही अधिक खर्च उमेदवारांना करावा लागतो हे उघड गुपित आहे.
ग्रा.प. सदस्याला 50 हजार सरपंचाला पावणेदोन लाख खर्चाची मर्यादा..
सरपंच उमेदवारासाठी
सदस्य संख्या —- खर्च मर्यादा
7 ते 9 सदस्य :- 50 हजार रुपये
11 ते 13 सदस्य :- 1 लाख रुपये
15 ते 17 सदस्य :- 1 लाख 75 हजार रुपये
ग्रामपंचायत सदस्यासाठी
सदस्य संख्या —- खर्च मर्यादा
7 ते 9 सदस्य :- 25 हजार रुपये
11 ते 13 सदस्य :- 35 लाख रुपये
15 ते 17 सदस्य :- 50 हजार रुपये