राज्यातील शासकीय महाविद्यालये, अशासकीय अनुदानित महाविद्यालये, अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापन व कला महाविद्यालये यामधील तासिका तत्त्वावरील अध्यापकांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. या अध्यापकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी विधानसभेत केली.
नव्या सुधारित दरानुसार अध्यापकांच्या मानधनात प्रतितास 900 ते 1500 रुपये वाढ करण्यात आली आहे. अध्यापकांच्या मानधन वाढीसंदर्भात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत एका निवेदनाद्वारे घोषणा केली.
राज्यातील उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातील तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी सातत्याने केली जात होती. या मागणीचा विचार करून त्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाला सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला वित्त विभागाने मान्यता दिल्यानंतर अध्यापकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला, अशी माहिती पाटील यांनी दिली.
असे आहेत सुधारित दर..
उच्च शिक्षण संचालनालय :-
कला, वाणिज्य, विज्ञान पदवी अभ्यासक्रमाकरिता रु. 625 / – वरून रु. 100 /- प्रति तास व पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरिता रु. 750/- वरून रु. 1000 /- प्रति तास.
शिक्षणशास्त्र / शारीरिक शिक्षण विधीवर या व्यावसायिक अभ्याक्रमांकरिता रु. 750 /- वरून रु.1000 / – प्रति तास.
तंत्र शिक्षण संचालनालय :-
उद्योग व्यवसाय क्षेत्रातून निमंत्रित तज्ज्ञ / अनुभव संपन्न ज्येष्ठ अभियंता यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान रु. 1000 /- वरून रु .1500 /- प्रति तास पदवी / पदव्यत्तर अभ्यासक्रमांसाठी मानधन दर रु. 600 /- वरून रु. 900 /- प्रति तास.
पदविका अभ्याक्रमांसाठी मानधन दर रु. 500 /- वरून रु.800 /- प्रति तास.
कला संचालनालय :-
उद्योग व्यवसाय क्षेत्रातून निमंत्रित तज्ज्ञ / अनुभव संपन्न ज्येष्ठ व्यवस्थापक यांचे व्याख्यान मानधन दर रु. 750 /- वरून रु .1500 /- प्रति तास. क
ला शिक्षण पदविका तसेच पदवी / पदव्युत्तर पदविका / पदव्युत्तर पदवी अभ्याक्रम मानधन दर रु. 625 / – वरून रु. 900 /- प्रति तास