Take a fresh look at your lifestyle.

New features : फक्त 1 मोबाइल नंबर करा USE, अन् काढा संपूर्ण कुटुंबाचं Aadhaar PVC card

0

शेतीशिवार टीम, 7 फेब्रुवारी 2022 : आधार कार्ड हे भारतीयांसाठी सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट्स आहे. सरकारी काम असो की खाजगी, सगळीकडे काम करतं. सध्या बहुतेक लोकांच्या आधार कार्ड नेहमी पर्समध्ये ठेवतात. मात्र पेपर कोट असल्याने आधार कार्ड कट होऊन पावसात भिजून किंवा अन्य कारणाने खराब होण्याची भीती असते.

तुम्हालाही अशा कोणत्याही समस्येचा सामना करावा लागला असेल किंवा तुम्हाला त्याचा सामना करायचा नसेल, तर आधार पीव्हीसी कार्ड (Aadhaar PVC card) घेऊन तुम्ही या समस्येपासून दूर राहू शकता.

प्लास्टिक असल्याने ते खराब होत नाही. आधार PVC कार्ड नवीन नसलं तरी चांगली गोष्ट म्हणजे आता तुम्ही फक्त एक मोबाईल नंबर वापरून संपूर्ण कुटुंबासाठी ते ऑर्डर करू शकता….

खरं तर, UIDAI ने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवर असं म्हटलं आहे की “तुमच्या #Aadhaar वर रजिस्टरकृत मोबाइल क्रमांकासोबत #authentication साठी तुम्ही #OTP प्राप्त करण्यासाठी कोणताही मोबाइल नंबर वापरू शकता. याद्वारे, एखादी व्यक्ती आधार पीव्हीसी कार्ड ऑनलाइन ऑर्डर करू शकते. अन् ते पण संपूर्ण कुटुंबासाठी..

तुम्हाला हे माहित असणं आवश्यक आहे की, आधार PVC कार्डमध्ये डिजिटल स्वाक्षरी केलेला सुरक्षित (QR) कोड आहे, ज्यामध्ये अनेक सुरक्षा सिक्योरिटी फीचर्ससह सह डेमोग्राफिक डिटेल्सचा समावेश आहे. परंतु, ते विनामूल्य नसून तुम्हाला या पीव्हीसी कार्डसाठी (Aadhaar PVC card) अर्ज करणाऱ्या प्रत्येकाला नाममात्र रक्कम म्हणून 50 रुपये भरावं लागणार आहे.

आधार क्रमांक (Aadhaar number), व्हर्च्युअल आयडी (Virtual ID) किंवा एनरोलमेंट आयडी वापरून uidai.gov.in किंवा Resident.uidai.gov.in वर कार्ड ऑनलाइन ऑर्डर केलं जाऊ शकतं. आधार पीव्हीसी कार्ड (Aadhaar PVC card) ऑनलाइन कसं मिळवायचं हे जाणून घेण्यासाठी खालील स्टेप्स करा फॉलो…

आधार पीव्हीसी कार्ड (Aadhaar PVC card) ऑनलाइन कसं मिळवाल ?

स्टेप्स 1 : UIDAI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा https://uidai.gov.in टाइप करून Google वर सर्च करा.

स्टेप्स 2 : ‘Order Aadhaar PVC Card’ सर्व्हिसवर क्लिक करा. आणि तुमचा 12 अंकी यूनिक आधार नंबर (UID) किंवा 28 अंकी एनरोलमेंट प्रविष्ट करा.

स्टेप्स 3 : सिक्योरिटी कोड प्रविष्ट करा आणि नंतर चेक बॉक्सवर क्लिक करा ‘जर तुमच्याकडे रजिस्टर्ड मोबाइल नंबर नसेल, तर कृपया बॉक्स मध्ये चेक करा.

स्टेप्स 4 : नॉन-रजिस्टर्ड / अल्टरनेट मोबाइल नंबर प्रविष्ट करा. त्यानंतर ‘Send OTP’ वर क्लिक करा.

स्टेप्स 5 : ‘Terms and Conditions’ च्या समोर चेक बॉक्सवर (Check box) वर क्लिक करा.

स्टेप्स 6 : OTP व्हेरिफिकेशन पूर्ण करण्यासाठी ‘Submit’ ऑप्शनवर क्लिक करा.

स्टेप्स 7 : नंतर ‘Make payment’ वर क्लिक करा. तुम्हाला Credit/Debit कार्ड, नेट बँकिंग आणि UPI सारख्या पेमेंट ऑप्शन निवडा. नंतर रीडायरेक्ट केलं जाईल.

पेमेंट यशस्वी झाल्यानंतर, डिजिटल सिग्नेचर असलेली एक पावती तयार केली जाईल जी PDF फॉर्मेटमध्ये डाउनलोड करू शकतात. रहिवाशांना एसएमएस (SMS) द्वारे सेवा सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर देखील मिळेल.

Leave A Reply

Your email address will not be published.