Take a fresh look at your lifestyle.

देशातल्या सगळ्यात स्वस्त SUV tata motors ची जबरदस्त डिमांड ; महिनाभरात झाली 10 हजारांहून अधिक रेकॉर्डब्रेक विक्री !

0

शेतीशिवार टीम, 6 फेब्रुवारी 2022 : TATA मोटर्सने या वर्षी जानेवारीमध्ये आतापर्यंतचा रेकॉर्ड नोंदवला आहे. कंपनीने गेल्या महिन्यात पॅसेंजर व्हायकलच्या विक्रीत 50% वाढ नोंदवली आहे. 

Tata Motors ने जानेवारी 2022 मध्ये एकूण 40,777 पॅसेंजर व्हायकलची विक्री केली आहे. तसेच कंपनीच्या 2 वाहनांचा देखील टॉप 10 यादीत समावेश करण्यात आला आहे, ज्यात टाटा नेक्सॉन (Tata Nexon) आणि टाटा पंच (Tata Punch) आहेत.

सगळ्यात स्वस्त SUV ला जबरदस्त डिमांड…

टाटा नेक्सॉन (Tata Nexon) ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी एसयूव्ही (SUV) आहे, तर टाटा पंचलाही (Tata Punch) सध्या मार्केटमध्ये मोठी मागणी आहे. Tata Nexon ने गेल्या महिन्यात 13,816 मोटारींची विक्री केली आहे. अशाप्रकारे ती टॉप 10 च्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर या यादीत टाटा पंच दहाव्या क्रमांकावर आहे. पंचाने गेल्या महिन्यात 10,027 युनिट्सची विक्री केली. ही छोटी एसयूव्ही लॉन्च होऊन अवघे 5 महिने झाले आहेत.

किंमत फक्त 5.64 लाख रुपयांपासून सुरू…

ही त्याच्या सेगमेंटमधील आत्तापर्यंतची सर्वात स्वस्त एसयूव्ही (SUV) आहे. त्याची किंमत 5.64 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 8.98 लाख रुपयांपर्यंत जाते. निसान मॅग्नाइट (Nissan Magnet) आणि रेनॉ किगर (Renault Kigar) सारख्या वाहनांशी त्याची स्पर्धा आहे. Nissan Magnite ची किंमत रु. 5.76 लाख आणि Renault Chiger ची किंमत रु. 5.79 लाख पासून सुरू होते. टाटा पंच एकूण 4 व्हेरियंटमध्ये येते – Pure, Adventure, Accomplished, आणि Creative.

इंजिन आणि फीचर्स :-

टाटा ने याला Altroz ​​सारखे 1.2-लीटर पेट्रोल इंजिन (86PS/113Nm) दिलं आहे जे 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड AMT गिअरबॉक्समध्ये येतं. टाटा पंचमध्ये 7- इंचाची टचस्क्रीन सिस्टीम, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ऑटो एसी, ऑटोमॅटिक हेडलाइट्स आणि वायपर्स आणि क्रूझ कंट्रोल मिळते.

Leave A Reply

Your email address will not be published.