Mukesh Ambani Car : मुकेश अंबानींनी खरेदी केली 13 कोटींची Rolls Royce ; ‘या’ VIP नंबरसाठी मोजले तब्बल ‘इतके’ लाख !
शेतीशिवार टीम, 5 फेब्रुवारी 2022 : भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी (Reliance Industries Chairman Mukesh Ambani) यांनी नवीन कार खरेदी केली आहे. ही रोल्स रॉयस (Rolls Royce) हॅचबॅक आहे, या कारची किंमत 13.14 कोटी रुपये आहे.
या अल्ट्रा लक्झरी कार्समध्ये असं इंजिन आणि फीचर्स देण्यात आलं आहे की, सर्वसामान्यांन लोकांना तरआश्चर्य वाटेल. आरटीओ (RTO) अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, ही भारतातील आतापर्यंतची सर्वात महागडी कार आहे.
या कारचे मॉडेल नाव Rolls Royce Cullinan असं आहे. या कारबद्दलची माहिती असलेल्या अधिकार्यांनी सांगितलं की, Rolls-Royce Cullinan पेट्रोल मॉडेल कारचे रजिस्ट्रेशन RIL ने 31 जानेवारी रोजी दक्षिण मुंबईतील तारदेव प्रादेशिक परिवहन कार्यालयात केलं होतं.
2018 मध्ये लॉन्चच्या वेळी या कारची मूळ किंमत 6.95 कोटी रुपये होती. परंतु, वाहन उद्योगातील तज्ञांच्या मते, कस्टमाइज्ड मॉडिफिकेशनमुळे किंमतीत लक्षणीय वाढ झाली आहे.
इंजिन 564BHP :-
आरटीओ (RTO) अधिकाऱ्यांनी सांगितले की, कंपनीने 2.5 टन वजनाच्या वाहनासाठी ‘टस्कन सन’ (Tuscan Sun) रंग निवडला आहे. यात 564 bhp पॉवर असलेले 12-सिलेंडर इंजिन आहे. कारसाठी खास नंबर प्लेटही निवडण्यात आली आहे.
कार रजिस्ट्रेशन 30 जानेवारी 2037 पर्यंत वैध आहे. RIL ने रजिस्ट्रेशनसाठी ₹ 20 लाखांचा एकरकमी टॅक्स भरला आहे. तसेच, ₹ 40,000 रोड सेफ्टी टॅक्स म्हणून भरले गेले आहेत.
12 लाखात घेतला VIP नंबर :-
RIL ने मुकेश अंबानींच्या नवीन कारसाठी ‘0001’ हा VIP नंबर घेतला आहे, त्यासाठी त्यांनी 12 लाख रुपये मोजले आहे. अहवालानुसार,सहसा VIP क्रमांकाची किंमत ₹4 लाख असते, परंतु सध्याच्या सीरीजमध्ये निवडलेला क्रमांक आधीच घेतला होता, त्यामुळे तो अधिक महाग झाला आहे.