शेतीशिवार टीम, 5 फेब्रुवारी 2022 : हैदराबाद मधील स्टार्टअप कंपनी ग्रॅव्हटन मोटर्सच्या (Gravton Motors) इलेक्ट्रिक बाइकने एक अनोखा विक्रम केला आहे. कंपनीच्या क्वांटा इलेक्ट्रिक (Quanta EV) टू-व्हीलरने विक्रमी वेळेत 4011 किमी अंतर कापलं आहे.
कंपनीने सांगितले की, (Quanta EV) इलेक्ट्रिक वाहनाने कन्याकुमारी ते खारदुंगला (लडाख) हे अंतर अवघ्या 164 तास 30 मिनिटांत (6.5 दिवसांत) पूर्ण केलं. अशा प्रकारे (Quanta EV) ने एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये प्रवेश केला आहे.
बॅटरी चार्ज न करता प्रवास केला पूर्ण…
कंपनीने ही राइड 13 सप्टेंबर 2021 रोजी कन्याकुमारी येथून सुरू झाली अन् 20 सप्टेंबर 2021 रोजी खारदुंग ला येथे पोहोचली. विशेष म्हणजे ही इलेक्ट्रिक दुचाकी बॅटरी चार्जिंगसाठी कुठेही थांबली नाही. कंपनीने सांगितले की, बाईकने स्वॅपेबल बॅटरी टेक्नोलॉजी (Swapable battery technology) वापर केल्याने टीमने कोणतेही चार्जिंग स्टॉप न घेता हे अंतर कापलं.
एका चार्जवर मिळते 320 Km रेंज…
या इलेक्ट्रिक वाहनात 3KW ची मोटर देण्यात आली आहे, जी जास्तीत जास्त 172 Nm टॉर्क जनरेट करते. यात सिटी, स्पोर्ट्स आणि इको असे तीन राइडिंग मोड आहेत. विशेष म्हणजे इको मोडमध्ये ती150 Km पर्यंत धावू शकते. तसेच,ड्युअल बॅटरीसह, त्याची रेंज 320KM पर्यंत जाते…
Quanta EV प्रथम भारतीय बाजारपेठेत ₹ 99,000 (Ex-showroom) मध्ये लॉन्च करण्यात आली. कंपनीचा दावा आहे की, ही टू-व्हीलर पूर्णपणे इन-हाउस तयार केली गेली आहे, ज्यामुळे ते मेड-इन-इंडिया उत्पादन बनते. हे इलेक्ट्रिक स्कुटर लाल, पांढरा आणि काळा या तीन रंगांच्या ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे…

आता आपण समजून घेऊया ही स्वॅपेबल बॅटरी टेक्नोलॉजी नक्की आहे तरी काय ?
आपण ज्या फीचर्स विषयी बोलत आहोत त्याला स्वॅपेबल बॅटरी टेक्नोलॉजी असं म्हणतात. काही लोकं याला डिटेचेबल बॅटरी देखील म्हणतात ज्याचा अर्थ अशी बॅटरी आहे जी तुम्ही स्कूटरमधून काढू शकता किंवा वेगळी करू शकता.
तुम्हाला माहिती आहे की, भारतात उपलब्ध असलेल्या सर्व इलेक्ट्रिक स्कूटरची कमाल रेंज 100 Km आहे. याचा अर्थ असा की एकदा स्कूटर पूर्ण चार्ज झाल्यावर तुम्ही जास्तीत जास्त 100 किलोमीटर चालवू शकता, तेही जेव्हा तुम्ही तुमची स्कूटर कमी वेगाने चालवत असाल आणि मागे सीटवर कोणीही बसलेले नसेल कारण अशा वेळी जास्त बॅटरी खर्च होते.

यामुळे इथे स्वॅपेबल बॅटरी कमी येते. जर तुमच्याकडे दुसरी चार्ज केलेली बॅटरी असेल, तर बॅटरी संपल्यावर तुम्ही ती सहज काढू शकता. आणि चार्ज केलेली बॅटरी तिच्या जागी ठेवू शकता आणि 100 किमीचा प्रवास दुप्पट म्हणजे 200 किमी करू शकता. जर तुम्हाला या पेक्षा अधिक प्रवास करायचा असेल तर तुम्ही बॅटरी स्वॅ पिंगस्टेशनवरून 5 मिनिटातच चार्जिंग करू शकता..
भारतात लाँच होत असलेल्या सर्व नवीन आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये, तुम्हाला बॅटरी स्वॅपिंग फीचर्स मिळेल जे खूप उपयुक्त आहे आणि तुमचा वेळ वाचवेल.