DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसह पेन्शनधारकांना लागली लॉटरी..! DA / DR मध्ये होणार प्रचंड वाढ, पहा महागाई भत्त्याचे कॅल्क्युलेशन..
केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठी लॉटरी लागली आहे. जानेवारी 2023 साठी त्यांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ करण्यात आली आहे. आता येत्या काही दिवसांत त्यांच्या डीए / डीआरमध्ये प्रचंड वाढ होणार आहे. महागाई भत्त्याची आकडेवारी जाहीर झाली असून आता फक्त मंजुरी बाकी आहे.
नवीन महागाई भत्ता फेब्रुवारी अखेरीस किंवा मार्चच्या होळीपूर्वी मंजूर होईल,अशी अपेक्षा आहे. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4% वाढ होणार आहे. ही वाढ जानेवारी 2023 साठी असेल. मात्र, त्याचे पेमेंट मार्चमध्ये खात्यावर जमा होणार आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांची थकबाकीही दिली जाणार आहे.
DA वाढीबद्दल मोठं अपडेट..
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (mahagai bhatta) 4 टक्क्यांनी वाढला आहे. जर आपण 7 व्या वेतन आयोगाच्या अंतर्गत महागाईचा तक्ता पाहिला तर जुलै 2022 पासून निर्देशांकात 2.6 अंकांची वाढ झाली आहे. यामध्ये एकूण 4.40% वाढ नोंदवण्यात आली आहे. अशा स्थितीत कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 42 टक्क्यांवर पोहोचला आहे.
तर सहाव्या वेतन आयोगात हा आकडा 222 टक्क्यांवर पोहोचला आहे. नवीन AICPI निर्देशांकानुसार, कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता आणि महागाई सवलतीमध्ये 4% वाढ होईल. डिसेंबर 2022 मध्ये, निर्देशांक 0.2 अंकांनी कमी होऊन 132.3 अंकांवर आला आहे.
DA मध्ये किती वाढ होणार? यावरून घ्या समजून..
केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता (mahagai bhatta) औद्योगिक कामगारांसाठी (अखिल-भारतीय CPI-IW) ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारावर ठरवला जातो. डिसेंबर 2022 साठी, CPI-IW संख्यांच्या आधारे महागाई भत्ता 42.40% असेल. परंतु, जर ते दशांश मध्ये वाढवले नाही तर महागाई भत्ता 42% वर निश्चित केला जाईल. या संख्येसाठी, कामगार ब्युरो 88 औद्योगिक केंद्रांच्या 317 बाजारांमधून किरकोळ महागाईच्या किमतीवर एक निर्देशांक तयार करते.
DA किती वाढणार हे कसे कळणार ? चार्ट पहा
Increase/Decrease Index | Month | Base Year 2016 =100 | Base Year 2001=100 | Total of 12 Months | Twelve monthly average | % increase over 115.76 for 6CPC DA | % increase over 261.42 for 7CPC DA |
0.7 | July’22 | 129.9 | 374 | 4361 | 363.42 | 213.94% | 39.02% |
0.3 | Aug’22 | 130.2 | 375 | 4382 | 365.17 | 215.45% | 39.69% |
1.1 | Sep’22 | 131.3 | 378 | 4405 | 367.08 | 217.11% | 40.42% |
1.2 | Oct’22 | 132.5 | 382 | 4427 | 368.92 | 218.69% | 41.12% |
0 | Nov’22 | 132.5 | 382 | 4447 | 370.58 | 220.13% | 41.76% |
-0.2 | Dec’22 | 132.3 | 381 | 4467 | 372.25 | 221.57% | 42.40% |
DA/DR from Jan, 23 | 221% | 42% |