पुणे नाशिक सेमी हाय – स्पीड रेल कॉरिडॉर प्रकल्प हा 234.60 किमीचा प्रस्तावित सेमी हाय – स्पीड दुहेरी रेल्वे मार्ग आहे जो महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर आणि नाशिकला 24 स्थानकांद्वारे जोडणारा असून यासाठी 16,039 कोटींचा खर्च करण्यात येणार आहे.
या ग्रीनफिल्ड मार्गावरील प्रवासी गाड्या, 2027 च्या अंतिम मुदतीसह, 200 किमी प्रतितास वेगाने धावणार असून पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांमधून जात असताना पुणे ते नाशिक दरम्यानचे अंतर फक्त दोन तासात पूर्ण करणार आहे.
या मार्गावरील मालवाहतूक गाड्या 100 किमी प्रतितास वेगाने धावतील आणि चाकण, सिन्नर सातपूर आणि खेड, नारायणगाव आणि मंचरमधील विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) यासारख्या महत्त्वाच्या MIDC क्षेत्रांना जोडून औद्योगिक विकासासाठी एक नवीन मार्ग उघडण्यास मदत होणार आहे.
संपूर्ण रूटमॅप पाहण्यासाठी इथे क्लिक करा
Pune – Nashik Rail Route Map