पुणे-नगर-नाशिक हायस्पीड रेल्वे : अखेर रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी, 234Km अंतरासाठी 16,039 कोटींचा खर्च, हे आहेत 24 स्टेशन्स, पहा Route Map
राज्यातील रेल्वे वाहतुकीला गती देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुणे – अहमदनगर – नाशिक हा नवा सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प उभा करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी सरकारी पातळीवर अनेक प्रयत्नही करण्यात आले. एकदा तर प्रकल्प रद्द होण्याची वेळ देखील अली होती. मात्र या सर्व अडचणींवर मात करत अखेर या प्रकल्पाला केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मान्यता दिली आहे.
या पूर्वीच भारतीय रेल्वे बोर्डाने मान्यता दिलेल्या पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प केवळ केंद्र शासनाच्या अंतिम मंजुरीसाठी प्रकल्प थांबला होता, आता या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यामुळे लवकरच पुणे-नाशिक रेल्वे प्रवास जलद गतीने पूर्ण करता येणार आहे.
पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला मान्यता दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावरून केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत. सोबतच या प्रकल्पामुळे या दोन्ही शहरांच्या विकासाला मोठी गती मिळेल, असेही म्हटले आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आपल्या कार्यकाळात या रेल्वेमार्गाला मंजुरी मिळावी, यासाठी प्रयत्न केले होते. तर खासदार अमोल कोल्हे यांनी या प्रकल्पाची मागणी उचलून धरली होती. रेल्वे मंत्रालयाने आता हा हायस्पीड रेल्वे प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला असल्याने सर्व स्तरातून समाधान व्यक्त केले जात आहे.
अहमदनगर, नाशिकला जोडणार पुणे – नाशिक असा थेट रेल्वे मार्ग नसल्याने पुणे किंवा नाशिक गाठण्यासाठी मुंबईला येऊन रेल्वे पकडावी लागते. त्यामुळे प्रवासासाठी सहा तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ लागतो. तसेच प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने हायस्पीड रेल्वेची संकल्पना अंमलात आणली आहे. हा रेल्वे मार्ग पुणे – अहमदनगर – नाशिक या तीन जिल्ह्यांना जोडणारा असल्याने या तिन्ही जिल्ह्यांच्या विकासाला चालना मिळणार आहे.
चाकण, सिन्नर, सातपूर, खेड, नारायणगाव आणि मंचरमधील विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) यासारख्या महत्त्वाच्या MIDC क्षेत्रांना जोडून औद्योगिक विकासासाठी एक नवीन मार्ग उघडणार असून शेतकऱ्यांना शेतमालाची ने – आण करण्याची मोठी सुविधा देखील यामुळे निर्माण होणार आहे.
या प्रकल्पासाठी संगमनेर तालुक्यातील 26 गावांमध्ये 293 हेक्टर जमिनीचे भूसंपादन होणार आहे. त्यापैकी आतापर्यंत थेट खरेदीने 19 हेक्टर जमिनीचे भूसंपादन झाले आहे. त्या माध्यमातून संबंधितांना 129 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. तालुक्यातील वनविभागाची 46 हेक्टर जमीन, सरकारी 15 हेक्टर जमीन रेल्वे मार्गात जाणार आहे.
या प्रकल्पाला फेब्रुवारी 2020 मध्ये, लाईनचा सुधारित डिटेल्स प्रोजेक्ट रिपोर्ट (DPR) भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वेने (CR) मंजूर केला होता. या DPR ला आता महाराष्ट्र राज्य सरकारने मान्यता दिली असून अंदाजे 1458.69 हेक्टर जमीन भूसंपादित होणार आहे. यापैकी 30 हेक्टर पेक्षा अधिक खासगी जागा संपादित केली आहे, अशी माहिती महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडकडून देण्यात आली. काही गावांमध्ये भूसंपादन सुरु झालं आहे. तसेच सरकारी आणि वन जमीन संपादनाचीही प्रक्रिया सध्या सुरू आहे.
Pune – Ahmednagar – Nashik Semi High Speed Rail :- रूट मॅप पाहण्यासाठी खाली क्लीक करा.
Route Map
अशी असेल हायस्पीड रेल्वे :-
पुणे -अहमदनगर- नाशिक हा 234.60 Km अंतर असलेला सेमी – हाय – स्पीड दुहेरी रेल्वे मार्ग असणार आहे जो महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर आणि नाशिकला 24 स्टेशनच्या माध्यमातून जोडणार आहे यामध्ये 18 बोगद्यांचा देखील समावेश आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या संयुक्त विद्यमाने या प्रकल्पासाठी 16,039 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे, यामध्ये राज्याचा 3,273 कोटींचा हिस्सा असणार आहे.
या मार्गावरून 140 किलोमीटर प्रतितास वेगाने रेल्वे धावणार आहे. पुढे हा वेग 250 किलोमीटरपर्यंत वाढवता येणार आहे. भूसंपादन झाल्यानंतर विद्युतीकरणासह एकाचवेळी दुहेरी मार्गाचे काम देखील होणार आहे.
स्थानकांची नावे :
पुणे, हडपसर, मंजिरी, कोळवाडी, वाघोली, आळंदी, चाकण, राजगुरुनगर, भोरवाडी, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, बोटा, जांबुत, साकूर, अंभोरे, संगमनेर, देवठाण, चास, दोडी, सिन्नर, मोहादरी, शिंदे आणि नाशिक रस्ता..