महाराष्ट्रात गेल्या तीन – चार दिवसांपासून पावसाचा वेग कमी होत असल्याचे चित्र समोर येत आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईतही जोरदार पाऊस झाला आहे. मात्र, आता पावसाचा वेग पुन्हा एकदा वाढला आहे. शुक्रवारी पहाटेपासूनच राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरुवात झाली असून येत्या काही तासांत मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
पावसामुळे 2-3 तास महत्वाचे..
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 4 ते 5 तासांत मुंबई आणि ठाण्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकांना हवामानाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोकणासह पश्चिम किनारपट्टीवर मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून आज काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे.
मुंबईकरांना उन्हापासून मिळाला दिलासा :-
आज सकाळपासून मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस पडत आहे. वास्तविक, गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला होता. त्यामुळे वातावरण तापलेले दिसत होते पण आज पुन्हा एकदा मुंबईकरांना उन्हापासून दिलासा मिळणार आहे. मुंबई उपनगरात सकाळपासून पाऊस पडत आहे. पश्चिम उपनगरातही जोरदार पाऊस सुरू आहे.
आज सकाळपासून मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाळा सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला होता. त्यामुळे वातावरण तापलेले दिसत होते पण आज पुन्हा एकदा मुंबईकरांना उन्हापासून दिलासा मिळणार आहे. मुंबई उपनगरात सकाळपासून पाऊस पडत असून पश्चिम उपनगरातही जोरदार पाऊस सुरू आहे.
पावसामुळे अंधेरी भुयारी मार्ग गेला पाण्याखाली..
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये पाणी साचले आहे. हा भुयारी मार्ग बंद करण्यात आला आहे. मुंबईतील सखल भागातही पाणी साचू लागले आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, विठ्ठलवाडी, बदलापूर येथेही मुसळधार पाऊस झाला. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, मालाडसह मुंबई उपनगरातील सर्वच भागात यावेळी मुसळधार पाऊस पडत आहे.
या शहरांत मुसळधार पाऊस..
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबई, सानपाडा, सीवूड दार्वे, खारघर, बेलापूर आणि खंडेश्वर परिसरात पावसाचा जोर कायम असून, नवी मुंबईसह पनवेल आणि रायगडमध्ये वादळी पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, पुढील 5 दिवस राज्यात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
पुढील 5 दिवस राज्यात पावसाची शक्यता..
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 5 दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस आणि मराठवाड्यासह इतर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.