महाराष्ट्रातील अनेक भागात शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. पाऊस न पडल्याने शेतकरी प्रचंड नाराज झाले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. दरम्यान, हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून रायगड, पालघर, पुणे आणि सातारा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणात तसेच मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईसह ठाण्यातही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

रत्नागिरी, कोल्हापूर, ठाणे, नाशिक, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

आज पुण्यासह पालघर, सातारा आणि रायगडमध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या चार जिल्ह्यांत आज मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबईत आज ऑरेंज अलर्टसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.

मुंबईत आजही मुसळधार पावसाची शक्यता..

मुंबईच्या आकाशात ढग दाटून आल्याने गेल्या 24 तासांत जोरदार पाऊस झाला. हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार, सीएसटी, कुलाबा, सांताक्रूझ आणि विद्याविहार भागात 100 मि.मी. अधिक पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्याने बुधवारीही ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबईत मान्सून सक्रिय झाला आहे.

प्रादेशिक हवामान विभागाने सोमवार आणि मंगळवारसाठी यलो अलर्ट जारी केला होता. सोमवारी सकाळी 8.30 ते मंगळवारी सकाळी 8.30 पर्यंत सांताक्रूझ येथे सर्वाधिक 119.9 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे, तर सीएसएमटीमध्ये 111 मिमी, विद्याविहारमध्ये 106.6 मिमी. तर कुलाबा येथे 106 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच मंगळवारी सकाळी 8.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत उपनगरात सरासरी 16 मि.मी. आणि शहरात 24.6 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. शुक्रवारपर्यंत महानगरात चांगला पाऊस पडेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

एका माजी हवामान तज्ज्ञाने सांगितले की, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून त्यामुळे मुसळधार पाऊस पडत आहे. बुधवारी मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर पावसाचा जोर हळूहळू कमी होईल. या हंगामात उपनगरात एकूण 1306.6 मि.मी. आणि शहरात 933.7 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

मुंबई – पुणे ट्रेन रद्द..

पुणे, लोणावळा, कर्जत – मुंबई मध्ये काल रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई – पुणे दरम्यान धावणाऱ्या रोजच्या एक्स्प्रेस ट्रेन डेक्कन क्वीन, डेक्कन एक्स्प्रेस, सिंहगड एक्स्प्रेस, इंटरसिटी आणि इंद्रायणी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.

महत्वाचे लाईव्ह अपडेट.

रायगड जिल्ह्यामधील आपटा हे गाव पाण्याखाली गेलेलं असून पाताळगंगा नदीला पूर आला आहे. शाळा – शासकीय कार्यालयांना सुट्टी..

खेडमध्ये जगबुडी आणि नारंगी नदीला पूर आलेला आहे. खाडीपट्टा विभागातील 30 गावांचा संपर्क तुटलेला आहे

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून 43 बंधारे पाण्याखाली आले आहेत. पावसामुळे पंचगंगेची पाणी पातळी 25 फुटांवर पोहचली आहे.

ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, उल्हासनगर, अंबरनाथ, भिवंडी जिल्ह्यात चिक्कार पाऊस, रेल्वे सेवेवर प्रचंड मोठा परिणाम..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *