Kia India ने अलीकडेच आपली फेस लिफ्ट Seltos मार्केटमध्ये आणली असून ती लवकरच लॉन्च होण्याची शक्यता आहे. त्याची बुकिंग 14 जुलैपासून सुरू झाली आणि केवळ एका दिवसात (24 तासांत) 13,424 पर्यंत या व्हेरियंटची बुकिंग झाली आहे.

जे हे दर्शविते की ग्राहकांना हे मॉडेल खूपचं पसंद पडलं आहे. Seltos SUV फेसलिफ्ट भारतात 4 जुलै 2023 रोजी सादर करण्यात आली होती. नवीन मॉडेलच्या डिझाईनपासून अनेक चांगले फिचर्सही यामध्ये पाहायला मिळाले आहे.

मिड साईझ एसयूव्ही (SUV) सेगमेंटमध्ये, न्यू फेसलिफ्ट Seltos मध्ये जबरदस्त फीचर्सची भरमार आहे. या कारच्या बुकिंगसाठी कंपनीने 25,000 रुपये टोकन मनी ठेवले आहेत. कंपनीने 2019 मध्ये सेल्टोस सादर केली होती. Kia ने अद्याप त्याच्या किमती जाहीर केल्या नसल्या तरी आज आपण या न्यू मॉडेलच्या सर्व फीचर्स इंजिनबद्दल जाणून घेऊया..

बुकिंग K-Code : –

बुकिंगपैकी, 1,973 बुकिंग K – Code वापरून केल्या गेल्या, हा विशेष कार्यक्रम विशेषत: ऑनर्स सेल्टोस मालकांना प्राधान्य वितरण प्रदान करण्यासाठी डिझाइन केलेला आहे.

हे आहेत जबरदस्त फीचर्स..

Kia ने या SUV कारमध्ये अनेक फीचर्स समाविष्ट केले आहेत. नवीन सेल्टोस ADAS (Advanced Driver Assistance System) फीचर्सने सुसज्ज आहे. यासोबतच पॅनोरॅमिक सनरूफ, ड्युअल झोन ऑटोमॅटिक एसी आणि 10.25 इंच ड्युअल पॅनोरमिक डिस्प्लेसह अशी अनेक फीचर्स जोडण्यात आली आहेत.

शक्तिशाली 1.5 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन :-

उल्लेखनीय आहे की, कंपनीने अनुक्रमे 115PS आणि 116PS आउटपुटसह 1.5-लीटर पेट्रोल आणि डिझेल इंजिन कायम ठेवले आहेत. तसेच, 2023 किआ सेल्टोस फेसलिफ्टमध्ये हाय – एंड मॉडेलसह नवीन 1.5-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि GT लाइनसाठी 7-स्पीड ड्युअल-क्लच ट्रान्समिशन (DCT) गिअरबॉक्स देण्यात येत आहे.

ग्राहकांची Kia च्या कार्सनां अधिक पसंती..

Kia ने भारतातील प्लांटमधून 10 लाख वाहनांच्या प्रोडक्शनचा टप्पा गाठला आहे. कंपनीने आपले 1 दशलक्ष वे युनिट अनंतपूर येथील प्रोडक्शन सर्व्हिस मधून आणले आहे. नवीन Kia Seltos ने हा टप्पा गाठण्यात सर्वाधिक योगदान दिले आहे. ही लोकप्रिय मिड साईझ SUV भारतातील लोकांना खूप आवडते आणि आतापर्यंत तिने 5 लाखांहून अधिक युनिट्स विकल्या आहेत.

यानंतर कंपनीच्या सब-4 मीटर एसयूव्ही सॉनेटचा क्रमांक येतो. Kia Motors भारतीय बाजारपेठेत Seltos आणि Sonet सारख्या SUV तसेच Karens MPV आणि EV6 इलेक्ट्रिक क्रॉसओवर विकते. अलीकडे किआने कार्निव्हलची विक्री बंद केली आहे. कंपनी नवीन सेल्टोस 11-12 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *