बोरिवली-ठाणे दुहेरी बोगद्याचे बांधकाम लवकरच म्हणजे पावसाळा सुरू होण्याआधी सुरू होईल अशी चिन्हे दिसत आहेत. कारण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) या महत्त्वपूर्ण प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी तातडीने पावले उचलली आहेत ज्यामुळे या दोन महत्वाच्या शहरांमधील प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल. मात्र प्रकल्प राबविण्यास झालेल्या विलंबामुळे या प्रकल्पाची किंमत काही हजार कोटींनी वाढल्याचे समोर आले आहे.
घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीमुळे मागाठाणे (बोरिवली) ते टिकुजी-नी-वाडी (ठाणे) हे 24 किमी अंतर कापण्यासाठी रस्त्याने दीड तासापेक्षा जास्त वेळ लागतो. यावर उपाय म्हणून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून भुयारी मार्ग काढून अवघ्या 20 मिनिटांमध्ये बोरिवलीमध्ये पोहोचण्याच्या दृष्टीने या प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे. 11.84 किमी लांबीच्या या भुयारी रस्ता प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यास, प्रवासाचा वेळ फक्त 15-20 मिनिटांवर येणार आहे.
या प्रस्तावित प्रकल्पात दोन्ही टोकांना (ठाणे आणि बोरिवली) एकत्रितपणे 11.84 किमीचे दुहेरी बोगदे आणि 12.16 किलोमीटरचा मार्ग असणार आहे. अश्याप्रकारे एकूण 24 किमी नवीन रस्त्याचे बांधकाम, बोगद्यासह पुढील काही वर्षांत पूर्ण केले जाईल अशी अशा आहे.
शासनाच्या योजनेनुसार, पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटी प्रकल्पाचे संरेखन बोरिवलीतील मागाठाणेच्या एकता नगर येथे असेल आणि ठाण्यातील मानपाडा येथील टिकुजी-नी-वाडीच्या पुढे असेल. येणाऱ्या अडचणींना डोळ्यासमोर ठेवून एकमेकांना जोडणाऱ्या बोगद्यांसह प्रत्येक बोगद्यामध्ये तीन लेन (एकूण सहा) असतील. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीतील सर्वात मोठा अडथळा म्हणजे या प्रकल्पाचे वाढलेले बजेट, या प्रकल्पाचा खर्च रु.11,235 कोटींवरून रु.13,200 कोटींपर्यंत वाढला आहे.
राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडून एमएमआरडीएला वन्यजीव मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता प्रकल्प पुढे नेण्यासाठी पर्यावरण मंजुरी आवश्यक आहे. एमएमआरडीएच्या एका अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, “आम्ही हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी चार वर्षांचा कालावधी गृहीत धरला आहे. शिवाय हा भुयारी मार्ग जमिनीच्या 23 मीटर खाली असणार आहे.
हा भुयारी मार्ग सुरक्षा कॅमेरे, स्पीड कॅमेरे, स्मोक डिटेक्टर, वेंटिलेशन उपकरणे, अग्निशामक यंत्रे, ले-बे एरिया इत्यादी सर्व अत्याधुनिक आणि अत्यावश्यक सुविधांनी सुसज्ज असणार आहे. असे MMRDA चे महानगर आयुक्त, एस व्ही आर श्रीनिवास यांनी सांगितले.
या बोगद्याशिवाय गोरेगाव-मुलुंड लिंक रोड बांधण्यासाठी बीएमसीने टेंडरही काढले आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पार करण्यासाठी हा आणखी एक पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटी प्रकल्प असेल.
सध्याचे बोरिवली ते ठाणे अंतर हे 24 किमी इतके आहे. तर बोगद्याची प्रस्तावित लांबी: 11.84 किमी आहे. पृष्ठभागाखाली बोगद्याची खोली: 23 मी असून या प्रकल्पासाठी एकूण खर्च: 13,200 कोटी रुपये येईल असा अंदाज आहे.
Navi Mumbai Metro :
गेल्या अकरा वर्षांपासून रखडलेल्या बेलापूर ते तळोजा हा नवी मुंबईतील सिडकोचा पहिल्या – वहिल्या मेट्रो मार्गावरील टप्पा क्रमांक 2 अर्थात सेंट्रल पार्क ते बेलापूर दरम्यान यशस्वी चाचणी घेण्यात आली. यामुळे रोडपाली आणि तळोजा परिसराला मोठा फायदा होणार आहे. परंतु, हा मेट्रो मार्ग सुरू होण्यास आणखी सहा महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
मेट्रोचा फायदा कुणाला ?
नवी मुंबई मेट्रो ही बेलापूर ते तळोजा या मार्गावर धावणार आहे. हा संपूर्ण मार्ग नवी मुंबई शहरातील अंतर्गत भागातून जातो. या मार्गाचा खारघर नोडसह कळंबोली, रोडपाली आणि तळोजा परिसराला मोठा फायदा होणार आहे. तळोजा ही मोटी औद्योगिक वसाहत असून कळंबोलीचे स्टील मार्केट महा-मुंबईतील सर्वात मोठे स्ट्रीलमार्केट आहे.
येथे रोज हजारो चाकरमानी ये-जा करतात. त्याच्यासाठी एनएमएमटीची बससेवा आहे ती अतिशय अपुरी आहे. यामुळेही मेटो सुरू झाल्यास या प्रवाशासह बेलापूर – तळोजा परिसरातील विद्यार्थी आणि स्थानिकांना त्याचा मोठा लाभ होणार आहे.
नवी मुंबई मेट्रो मार्गावरील 11 स्टेशन्स पहा..
सीबीडी – बेलापूर , सेक्टर 7, सिडको सायन्स पार्क, उत्सव चौक, खारघर सेक्टर 11, खारघर सेक्टर 14 . खाघवर सेंट्रल पार्क, पेठपाडा, खारघर सेक्टर 34. पाचनंद आणि पेंढार – तळोजा ही 11 स्टेशन्स या मार्गावर आहेत.