PM Kisan : 13 व्या हप्त्याची तारीख ठरली, या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 2000 रुपये, प्रशासनाकडून e-KYC पूर्ण करण्याचे आवाहन..
प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 12 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. आता शेतकरी 13व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. याबाबत शेतकरी बँका, ऑनलाइन केंद्र आणि कृषी विभागाला भेट देऊन माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत आहे. आता शेतकऱ्यांसाठी एक खास बातमी समोर आली आहे. ज्यामध्ये पीएम किसान सन्मान निधीच्या हप्त्याशी संबंधित माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारच्या स्तरावरूनही हा हप्ता देण्याबाबत तयारी सुरु झाली आहे.
मकर संक्रांतीपूर्वी मिळणार हप्ता :-
शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 13 वा हप्ता वेळेवर पोहोचावा यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. यासंदर्भात वरच्या स्तरावर कागदोपत्री काम अद्यापही सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकार मकर संक्रांतीपूर्वी 13 वा हप्ता जाहीर करणार आहे. त्यामुळे येत्या आठवडाभरातच शेतकऱ्यांना तेरावा हप्ता मिळणार असल्याचं समजलं आहे. त्यामुळे देशातील करोडो शेतकऱ्यांची मकर संक्रांती गोड होणार आहे.
या कारणामुळे होत आहे विलंब :-
प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 12 वा हप्ताही शेतकऱ्यांच्या खात्यावर उशिराने पोहोचला होता. केंद्र सरकारने हाती घेतलेली अपात्र शेतकऱ्यांची छाटणी मोहीम हे त्यामागचे कारण मानलं जात आहे. प्रत्यक्षात केंद्र सरकारच्या या योजनेचा करोडो अपात्र लाभार्थी लाभ घेत होते. दर 4 महिन्यांनी अश्या अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर हप्ता पोहोचत होता.
याबाबत तक्रारी आल्यानंतर केंद्र सरकारने तातडीने छाटणी मोहीम सुरू केली. त्यामुळे 2 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर 12 वा हप्ता पाठवला गेला नाही. याच कारणास्तव शेतकरी वेगाने e-KYC प्रक्रिया करत आहेत. यामाध्यमातून केंद्र सरकार अपात्रांची हकालपट्टी करून पात्र शेतकऱ्यांना या योजनेत जोडत आहे. त्यामुळेच हप्ता मिळण्यास विलंब होत असल्याचे समोर आलं आहे.
e-KYC पूर्ण नाही केली तर 2000 चा हप्ता विसरा..
प्रशासनाकडून शेतकऱ्यांना आपली e-KYC पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जर शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यानंतर e-KYC पूर्ण केली नसेल तर 13वा हप्ता मिळणं कठीण होऊ शकतं. सरकारने ई-केवायसीसाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती, मात्र तरीही e-KYC चा पर्याय खुला आहे. अशा परिस्थितीत 13व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रथम ई-केवायसी करून घ्यावे..
e-KYC कसे कराल ?
सर्वप्रथम पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर जा
फार्मर्स कॉर्नरमधील e-KYC वर क्लिक करा.
नवीन पेज उघडेल, येथे तुमचा आधार क्रमांक प्रविष्ट करा.
नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर OTP येईल
ओटीपी टाकून सबमिट करा, ई-केवायसी येथे पूर्ण होईल..
CSC सेंटरवरही करू शकता e-KYC
जर तुम्हाला ऑनलाइन मोडमध्ये ई-केवायसी करायचे नसेल, तर तुम्ही कॉमन सर्व्हिस सेंटरला भेट देऊन हे सहज करू शकता. तुम्ही PM किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) साठी तुमच्या जवळच्या कोणत्याही कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) वर ई-केवायसी करू शकता. यासाठी 50 रुपये शुल्क आहे.
गेल्या वर्षी 1 जानेवारीला आला होता हप्ता :-
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यावर सातत्याने निधी पाठवत आहे. यंदा १ जानेवारीला पैसे खात्यात पोहोचले नाहीत. मात्र गेल्या वर्षी 1 जानेवारी 2022 रोजी केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवले होते. त्यावेळेस 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर 20 हजार कोटी रुपये पाठवण्यात आले. शेतकरी प्रथम केंद्र सरकारच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जाऊन त्यांची या योजनेबाबतचे स्टेटस पाहू शकतात. शेतकरी पात्र असल्यास, 13 वा हप्ता देखील खात्यात पोहोचेल अशी अपेक्षा आहे.