शेतीशिवार टीम, 29 डिसेंबर 2021 : गावरान कोंबडीच्या अंड्यामध्ये प्रोटिन्स चे पॉवर हाऊस आहे असं म्हणतात. काहींना अंड्याची भाजी करून खायला आवडते, तर काहींना उकडवून खातात. तर काही आम्लेट आवडीने खातात. थंडीत अंडी खाल्ल्याने शरीरच्या आत उबदार राहण्यास मदत होते. उकडलेले अंडे नियमित खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. यासोबतच त्वचा, डोळे आणि केसांसाठीही ते फायदेशीर आहे.
सकाळी नाष्टाला 2 उकडलेली अंडी खाणे चांगलं मानलं जातं. जर तुम्ही जिम किंवा वर्कआउट करत असाल तर तुम्ही 4 ते 6 पर्यंत अंडी खाऊ शकता. यामुळे दिवसभर शरीरात ऊर्जा राहते. यासोबतच भूकही कमी लागते, ज्यामुळे तुम्ही बाहेरचं जेवण करण्यापासून वाचता आणि वजन नियंत्रित राहतं…
रोग प्रतिकारशक्ती मजबूत होते:-
हिवाळ्यात अनेक रोगांपासून बचाव करण्यासाठी तसेच रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवण्यासाठी खूप महत्वाचे आहे.अंड्यांमध्ये प्रोटिन्स, व्हिटॅमिन्सयांसह असे अनेक पोषक घटक असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात.
अंडी खाण्याचे इतर फायदे :-
हृदय संबधी समस्या दूर राहतात :-
अंड्यांमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असते.असे असूनही, ते हृदयासाठी चांगले आहे कारण ते बॅड कोलेस्ट्रॉलची संख्या वाढू देत नाही.
व्हिटॅमिन-डी’ची कमतरता दूर होते :-
हिवाळ्यात शरीराला पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नसल्यामुळे व्हिटॅमिन-डी’ची कमतरता उद्भवू शकते. त्याचा थेट परिणाम हाडांवर होतो.अंडी खाणाऱ्यांना हा त्रास सहसा होत नाही.
अंडी खाल्ल्यानंतर कोणती गोष्टी खाऊ नये ?
अंडे खाल्ल्यानंतर लगेच केळी कधीही खाऊ नका. असे केल्याने तुम्हाला बद्धकोष्ठता,गॅस आणि आतड्यांचा त्रास होऊ शकतो.
काही लोक चव वाढवण्यासाठी अंड्यासोबत लिंबाचे सेवन करतात.ते खूप घटक असू शकते. असे केल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो.