देशवासीयांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवत आहे. 2014 मध्ये केंद्रातील मोदी सरकारने प्रधानमंत्री जन धन योजना सुरू केली. ही योजना देशवासियांना बँकिंग व्यवस्थेशी जोडण्याच्या तसेच स्वस्त आर्थिक सेवांचा लाभ देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली होती. जन धन योजनेअंतर्गत तुम्ही झिरो बॅलन्स बँक खाते उघडू शकता. या योजनेत अनेक प्रकारच्या सुविधा देण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये अपघात विमा, ओव्हरड्राफ्ट सुविधा, डेबिट कार्ड, चेक बुक आदींचा समावेश आहे.
झिरो खात्यातील शिल्लक वर 10,000 रुपयांची कर्ज सुविधा..
प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY) मधील सर्वात खास सुविधांपैकी एक म्हणजे ज्यांनी जन धन खाते उघडले आहे, त्यांना झिरो खात्यातील शिल्लक असतानाही 10,000 रुपयांपर्यंत कर्जाची सुविधा दिली जाते. ज्याला ओव्हरड्राफ्ट सुविधा म्हणतात. ही फक्त एक प्रकारची कर्ज सुविधा आहे. तर मग आपण जाणून घेऊ की, तुमच्या अकाऊंटमध्ये शिल्लक नसल्यावरही तुम्ही या योजनेअंतर्गत 10,000 रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी अर्ज कसा करू शकता..
अशा प्रकारे तुम्ही घेऊ शकता फायदा..
जन धन खाते उघडलेल्या कोणत्याही व्यक्तीला ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेंतर्गत, पूर्वी खातेदाराला 5,000 रुपयांच्या ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ मिळत होता, ज्याची मर्यादा आता 10,000 रुपये करण्यात आली आहे. याद्वारे तुम्ही एटीएम कार्ड किंवा यूपीआयद्वारे कर्जाची रक्कम सहज काढू शकता. परंतु, यामध्ये, जन धन खाते उघडल्यानंतर 6 महिन्यांनंतर 10,000 रुपयांपर्यंतच्या ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ दिला जातो.
कोणत्या खातेधारकांना मिळणार हा लाभ
सोप्या शब्दात सांगायचे तर, या योजनेअंतर्गत, ज्या खातेदारांचे खाते (पीएम जन धन खाते) 6 महिने जुने आहे त्यांना 10,000 रुपयांच्या कर्ज सुविधेचा लाभ दिला जातो. दुसरीकडे, जर तुमचे जन धन खाते 6 महिने जुने नसेल, तर तुम्ही फक्त 2,000 रुपयांपर्यंतच्या ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ घेऊ शकता.
जन धन योजनेअंतर्गत, ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ घेण्यासाठी कमाल वयोमर्यादा 65 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. जेव्हा तुम्ही जन धन खात्याद्वारे ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ घेता तेव्हा तुम्हाला कर्जाच्या रकमेवर दररोज व्याज भरावे लागते. परंतु तुम्ही कर्जाची रक्कम पुन्हा खात्यात जमा केल्यास त्या जमा केलेल्या रकमेवर व्याज आकारले जात नाही.
अशा प्रकारे उघडू शकता जन धन खाते..
या योजनेअंतर्गत, तुम्ही तुमचे जन धन खाते कोणत्याही सार्वजनिक क्षेत्रातील बँक (PSB) किंवा खाजगी बँकेत देखील उघडू शकता. यासाठी किमान वय 10 वर्षे निश्चित करण्यात आलं आहे.
हे खाते उघडण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड आणि पॅन कार्ड असणे आवश्यक आहे.
एवढेच नाही तर तुम्ही तुमचे कोणतेही जुने बचत खाते जन धन खात्यात रूपांतरित करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या बँक मॅनेजरशी संपर्क साधावा लागेल..
पहा जन धन खाते :- PDF फॉर्म