खरेदीखत म्हणजे जमिनीचा व्यवहार पूर्ण केल्याच पुरावा असतो. खरेदिखत करण्यापूर्वी जमीन खरेदी करणार्‍याने जमीन मालकाला ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे सर्व रक्कम पूर्ण करायची असते. जर सर्व रक्कम पूर्ण झाली नसेल तर खरेदीखत करू नये..

कारण, एकदा खरेदीखत झाले की नंतर जमीन मालक हा त्या जमिनीवरचा मालकी हक्क काढून घेत असतो. आणि खरेदीखत सहजासहजी रद्द होत नाही. रद्द करण्याचा अधिकार फक्त सर्वोच्च न्यायालयाला असतो. पण तसे मोठे पुरावे असावे लागतात.

खरेदीखताची नोंदणी संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयात झाल्यानंतर काही दिवसातच सातबारा नवीन मालकाच्या नावे होतो.

खरेदीखत करण्यासाठी ज्या गावातील जमीन असेल त्या संबधित दुय्यम निबंधक कार्याकायात जाऊन बाजारभावे आणि आपपसातील
ठरलेल्या रक्कमेवर मुल्यांकन करून मुद्रांकशुल्क काढून घ्यावे.

जमिनीचे मुल्यांकन हे जमिनीच्या प्रकाराप्रमाणे ठरलेले असते. आणि त्याचे सर्व दरपत्रक (रेडीरेकनर) त्या त्या तालुक्याच्या दुय्यम निबंधक अधिकारी यांच्या कार्यालयात उपलब्ध असतात. आणि मुल्यांकन काढून देण्याचे काम हे दुय्यम निबंधाकाचेच असते.

यामध्ये जमिनीची सरकारी किंमत आणि प्रत्यक्ष जमीन मालक व खरेदीदार यांच्यातील ठरलेल्या व्यवहारावर जी रक्कम जास्त असते त्यावर मुल्यांकन करून जास्त मुद्रांकशुल्क गृहीत धरला जातो..

मुद्रांकशुल्क काढून झाल्यावर दुय्यम निबंधक हे खरेदीखत दस्तऐवजासाठी लागणारे नोंदणीशुल्क व कागदपत्रे व इतर कार्यालयीन खर्चाची माहिती देतात.
हि सर्व माहिती घेऊन दुय्यम निबंधक यांनी ठरवून दिलेल्या मुद्रांकशुल्कावर आवश्यक ती माहिती लिहून उदा. सर्वे नं. जमिनीचे क्षेत्र,
जमिनीचा प्रकार, जमीन मालकांची नावे, जमीन खरेदी करण-याचे प्रयोजन त्याचप्रमाणे जमीन विकण्याचे प्रयोजन नमूद करावे लागते.

तसेच लागणारी सर्व कागदपत्रे जोडून खरेदीखत तयार करावे. यासोबत संगणकावर डाटाएंट्री करण्यसाठी लागणारा input भरून
दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी सदर करावा..

खरेदिखतासाठी लागणारी कागदपत्रे :-

1) सातबारा
2) मुद्रांकशुल्क
3) आवश्यक असल्यास फेरफार
4) आठ अ
5) मुद्रांक शुल्काची पावती
6) दोन ओळखीच्या व्यक्ती, त्यांचे फोटो प्रुफ
7) आवश्यक असल्यास प्रतिज्ञापत्र
8) N A order ची प्रत
9) विक्री परवानगीची प्रत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *