फक्त 12,750 रुपयांत शेतात लावा 3/5HP सोलर पंप; या 20 जिल्ह्यांचे 95% अनुदानावर अर्ज सुरु, पहा पात्रता, अर्ज नोंदणी प्रोसेस !

0

शेतकऱ्यांच्या सिंचनाची समस्या लक्षात घेऊन राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिवसा 8 तास सिंचन शक्य व्हावं म्हणून केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना योजना (Pradhan Mantri Kusum Yojana PMKY) राबवली जात आहे.

या अंतर्गत महाराष्ट्राला 2022 -23 या आर्थिक वर्षामध्ये 1 लाख सोलर पंपाचे उद्दिष्ट देण्यात आलं असून येणाऱ्या 5 वर्षांमध्ये या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 5 लाख सोलर पपं दिले जाणार असून याची अंमलबजावणी प्रक्रिया सुरु आहे.

या अंतर्गत आपण पाहिलं तर सध्या महाराष्ट्रामध्ये टप्पा : 2 च्या अंतर्गत 52 हजार 750 पंपाचे इन्स्टोलेशन प्रक्रिया सुरू असताना शेतकऱ्यांना नवीन नोंदणी करणे गरजेच असतं. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना कागदपत्रे अपलोड, पेमेंटचे ऑप्शन येत असतात.

महाराष्ट्रामध्ये 14 जिल्ह्यांमध्ये कोटा पूर्ण झाल्यामुळे नोंदणी प्रक्रिया बंद करण्यात आली आहे. तर अजूनही 20 जिल्ह्यांमध्ये SC / ST Open प्रवर्गाचा कोठा उपलब्ध असल्याने ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरु आहे. आता कोणत्या जिल्ह्यांसाठी आपण नोंदणी करू शकतो ? कोणत्या जिल्ह्यांची बंद आहे ? नोंदणी प्रक्रिया कशी करावी ? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेउया.

या कुसुम सोलर पंपासाठी पुणे, नाशिक जिल्ह्यांसह मराठवाडा विभागाचा खूप मोठा कल आहे त्यामुळे औरंगाबाद, अहमदनगर, बीड, धुळे, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड, परभणी, सोलापूर, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद आणि यवतमाळ या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना आपली नोंदणी करता येत नाही कारण या 14 जिल्ह्यांचा कोठा संपला आहे.

मात्र उर्वरित 20 जिल्ह्यामध्ये कोठा उपलब्ध आहे त्यामुळे आज देखील नोंदणी करता येत आहे. यामध्ये पुणे विभागातील SC / ST लाभार्थ्यांसाठी कोठा उपलब्ध आहे. तर सांगली, वर्धा, ठाणे, सिंधुदुर्ग, सातारा, अकोला, अमरावती, भंडारा,बुलढाणा जिल्ह्यामध्ये ST प्रवर्गासाठी फोटो उपलब्ध आहे.

चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, कोल्हापूर, लातूर जिल्ह्यातील ST प्रवर्गासाठी चा कोठा उपलब्ध आहे. तर नागपूर, पालघर, वाशिममध्ये SC / ST अशा दोन्ही प्रवर्गासाठी कोठा उपलब्ध आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यासाठी SC / ST Open प्रवर्गाचा कोठा उपलब्ध असून तुम्ही ठिकाणी नोंदणी करू शकता.

कुसुम सोलर या योजनेसाठी केंद्र शासनाचे 30 टक्के अर्थसहाय्य (Subsidy) उपलब्ध आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्याचा हिस्सा 10 टक्के आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्याचा हिस्सा 05 टक्के असणार असून उर्वरित 60 टक्के / 65 टक्के हिस्सा राज्य अशा निधीच्या प्रमाणात ही योजना राबविली जात आहे.

सौर कृषी पंप योजना लाभार्थी योगदान :-

श्रेण्या 3HP साठी लाभार्थी योगदान 5HP साठी लाभार्थी योगदान
सर्व श्रेणींसाठी (Open) 25500=00 (10%) 38500=00 (10%)
अनुसूचित जाति SC 12750=00 (5%) 19250=00 (5%)
अनुसूचित जनजाति ST 12750=00 (5%) 19250=00 (5%)

 

सौर कृषी पंप योजना 2022 ची कागदपत्रे :-

1.अर्जदाराचे आधार कार्ड.
2.ओळखपत्र.
3.पत्त्याचा पुरावा.
4.शेतीची कागदपत्रे.
5.बँक खाते पासबुक.
6.मोबाईल नंबर.
7.पासपोर्ट आकाराचा फोटो.

अर्ज कसा कराल :-

ज्या शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, ते सरकारच्या अधिकृत वेबसाइट kusum.mahaurja.com वर जाऊन ऑनलाइन अर्ज भरू शकतात. 

टीप : शेतकरी मित्रांनो हा अर्ज करणं जरासं कठीण असल्याने तुम्ही तुमच्या जवळच्या आपले सेवा (CSC) केंद्रावरही अर्ज करू शकता.

Leave A Reply

Your email address will not be published.