राज्य शासनाने अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा विकास घडवून आणण्यासाठी वेळोवेळी प्रोत्साहनात्मक धोरणे जाहीर केली आहेत. त्यानुसार शेतकन्यांच्या कृषिपंप वीजजोडण्यांचे विद्युतीकरण सौरऊर्जेद्वारे करण्यासाठी राज्य शासन गेल्या काही वर्षापासून स्वयंअर्थसहाय्यित तसेच केंद्र शासनाच्या अर्थसहाय्यातून विविध योजना आहे. 

त्याअंतर्गत केंद्र शासनाकडून देशभरात राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाभियानाला (पीएम – कुसुम) राज्यात गती देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला एक प्रकारे ‘शासन आपल्या दारी आले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.

ऑनलाइन प्रक्रियेद्वारे केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने 22 जुलै 2019 रोजी पीएम – कुसुम योजनेसाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या . तसेच, 13 जानेवारी 2021 रोजी 1 लाख सौर कृषिपंप व 30 ऑगस्ट 2022 रोजी पुढील 1 लाख असे एकूण 2 लाख सौर कृषिपंप आस्थापित करण्यासाठी मान्यता दिली.

महाराष्ट्र शासनाकडून 12 मे 2021 रोजी राज्यात या योजनेसाठी शासन निर्णय निर्गमित केला. या अंतर्गत दरवर्षी 1 लाख नग याप्रमाणे पुढील पाच वर्षामध्ये 5 लाख सौर कृषिपंप आस्थापित करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. योजनेंतर्गत खुल्या प्रवर्गातील शेतकयांना 90 टक्के व अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना 95 टक्के अनुदानावर सौर कृषिपंप उपलब्ध आहे.

या अभियानांतर्गत पुरविण्यात येणाऱ्या पंपांची वस्तू व सेवा करासह किंमत निश्चित केली आहे. 3 अश्वशक्तीच्या पंपाची किंमत 1 लाख 93 हजार 803 रुपये असून सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना 10 टक्के लाभार्थी हिस्सा 19 हजार 380 रुपये तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील लाभार्थ्याने 5 टक्के लाभार्थी हिस्सा प्रत्येकी 9 हजार 690 रुपये भरण आवश्यक राहणार आहे.

पंपाच्या किमती जाहीर, SC / ST / General लाभार्थ्यांना किती रक्कम भरावी लागणार ? नवे दरपत्रक पाहण्यासाठी..

इथे क्लिक करा

5 अश्वशक्तीच्या पंपाची किमत 2 लाख 69 हजार 746 रुपये असून सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्याने 26 हजार 975 रुपये तर अनुसूचित जाती व अनुसूचित जाती / अनुसूचित जमातीतील लाभार्थ्याने 13 हजार ४८८ रुपये इतका लाभार्थी हिस्सा भरणे आवश्यक राहणार आहे.

7.5 अश्वशक्तीच्या पंपाची किंमत 3 लाख 74 हजार 402 रुपये इतकी निश्चित केली आहे. त्यासाठी सर्वसाधारण, प्रवर्गातील लाभाथ्यांने 37 हजार 440 रुपये तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील लाभार्थ्याने 18 हजार 720 रुपये लाभार्थी हिस्सा भरणे आवश्यक राहील.

सौर कृषिपंप आस्थापनेचे उद्दिष्ट, पीएम – कुसुम योजनेच्या शासन निर्णयातील नमूद तरतूद, जिल्ह्याच्या ग्रामीण लोकसंख्येनुसार व प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर पूर्ण करावयाचे आहे.

महाऊर्जामार्फत शेतकऱ्यांचे नवीन अर्ज स्वीकारण्यासाठी 17 मे 2023 पासून कुसुम योजनेचे ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे.   https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B या पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

महाऊर्जामार्फत ऑनलाइन पोर्टल सुरू केल्यानंतर त्यास राज्यभरातील शेतकऱ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. आर्नलाइन पोर्टल सुरू कल्यापासून राज्यातून एकूण 30 हजार 584 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक 2 हजार 602 अर्ज आले आहेत.

कुसुम सोलर पंपासाठी अर्ज कसा भरावा ?

व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता यावा म्हणून पोटलचा दररोज आढावा घेऊन जिल्हानिहाय कोटा वाढवून देण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी कोटा उपलब्ध नसल्यास, वाट पाहून कोटा उपलब्ध झाल्यावर अर्ज करावा, असे आवाहन महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण अर्थात महाऊर्जाने केले आहे . योजनची व ऑनलाइन अज करण्याची सर्व माहिती www.mahaurja.com या सकत्तस्थळावर उपलब्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *