Take a fresh look at your lifestyle.

कर्ज हवंय मंग बँकेची काय गरज ? LIC पॉलिसी होल्डर असाल तर मिळवा 10 लाखांपर्यंत कर्ज, पहा पात्रता, कागदपत्रे, ऑनलाईन अर्ज प्रोसेस..

0

कर्ज घेण्याचे अनेक प्रकार आहेत, पण जेव्हा जेव्हा लोकांना कर्जाची गरज भासते तेव्हा ते जास्तकरून बँकेकडेच वळतात. पण तुम्ही तुमच्या एलआयसी पॉलिसीवर देखील अगदी आरामात कर्ज देखील घेऊ शकता. तुमच्याकडे LIC (लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) ची पॉलिसी असल्यास, तुम्हाला वैयक्तिक कर्ज मिळू शकते.

याची सगळ्यात खास बाब म्हणजे हे कर्ज तुम्हाला अत्यंत कमी व्याजदरात मिळू शकते. यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याचीही गरज नाही. तुम्ही घरबसल्या ऑनलाइन कर्जासाठी अर्ज करू शकता.

एलआयसी पॉलिसीवर वैयक्तिक कर्ज मिळविण्यासाठी, तुमच्याकडे भारतीय नागरिकत्व असणे आवश्यक आहे. यासाठी तुमचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.

तसेच, तुम्ही किमान तीन महिन्यांसाठी प्रीमियम भरला असणे आवश्यक आहे. परंतु हे कर्ज फक्त त्या ग्राहकांनाच मिळू शकते ज्यांच्याकडे LIC ची एंडोमेंट पॉलिसी आहे. अशी कर्जप्रणाली केवळ एंडोमेंट पॉलिसी अंतर्गत येतात. एंडोमेंट पॉलिसी म्हणजे अशी पॉलिसी ज्यात रक्कम पॉलिसीचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर किंवा मृत्यूनंतरच दिली जाते.

कर्जासाठी अर्ज कसा कराल ?

तुम्ही घरबसल्या एलआयसी पॉलिसीवर कर्जासाठी अर्ज करू शकता. ही प्रक्रिया ऑनलाइन आहे.

यासाठी तुम्हाला प्रथम LIC च्या अधिकृत वेबसाइट https://licindia.in/Home/Policy-Loan-Options वर जावे लागेल.

यानंतर तुम्हाला येथे ऑनलाइन कर्जाचा पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करा.

त्यानंतर तुम्हाला ‘थ्रू कस्टमर पोर्टल’ वर क्लिक करावे लागेल.

आता तुम्ही तुमचा यूजर आयडी, जन्मतारीख आणि तुमचा पासवर्ड भरून येथे लॉग इन करू शकता.

यानंतर तुम्हाला ज्या पॉलिसीवर कर्ज घ्यायचे आहे ती पॉलिसी निवडा.

अश्याप्रकारे प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच तुमचा अर्ज मंजूर होण्यासाठी 5 दिवस लागतील. त्यानंतर कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल.

आवश्यक कागदपत्रे :-

एलआयसीच्या पॉलिसीवर तुम्हाला किमान सहा महिन्यांसाठी कर्ज मिळू शकते. एलआयसी पॉलिसीवरील कर्जासाठी, तुमच्याकडे आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, इतर कोणतेही ओळखपत्र आणि दोन पासपोर्ट आकाराचे फोटो असणे आवश्यक आहे.

तसेच पत्त्याच्या पुराव्यासाठी आधार कार्ड, मतदार ओळखपत्र किंवा परवाना देता येईल. उत्पन्नाच्या पुराव्यासाठी बँक तपशील आणि पेमेंट स्लिप आवश्यक आहे. या सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरच तुम्हाला पॉलिसीवर कर्ज मिळू शकतं.

Leave A Reply

Your email address will not be published.