इलेक्ट्रिक कार बनवण्याच्या रेस मध्ये अनेक नामांकित कंपन्या आघाडीवर आहे, आपलीच कार जास्तीत जास्त बॅटरी बॅकअप कसा देईल यावर कंपन्यांमध्ये नेहमीच रस्सीखेच सुरु असते. यामध्ये टेस्ला, टाटा,निसान, ह्युंदाई, फोक्सवॅगन यासारख्या कंपन्या आपल्याला सामान्यतः दिसून येतात.

मात्र आता या सर्वांमध्ये एका चायनीज कंपनीने देखील उडी घेतली आहे, बॅटरी बॅकअपच्या बाबतीत ही कार चांगल्या चांगल्या कार्सना टक्कर देताना आपल्याला दिसणार आहे.

चीनची ऑटोमोबाईल कंपनी BYD ने भारतात त्यांच्या इलेक्ट्रिक कार BYD ATTO 3 ची किंमत जाहीर केली आहे. कंपनीने या कारची एक्स-शोरूम किंमत 33.99 लाख रुपये इतकी जाहीर केली आहे.

ही कार खूप खास आहे कारण ARAI च्या चाचणीनुसार, ही कार एकदा पूर्ण चार्ज केल्यास 521 किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकते. कारचे डिझाइन आणि फीचर्स देखील खूप चांगले आहे. तुम्ही कार बुक करू शकता.

बॅटरीवर उत्तम वॉरंटी..

जर तुम्ही ही कार खरेदी केली तर कंपनी 6 वर्षांपर्यंत किंवा 1.5 लाख किलोमीटरपर्यंतची वॉरंटी देत ​​आहे. ट्रॅक्शन बॅटरीवर 8 वर्षे किंवा 1.6 लाख किमी वॉरंटी आणि मोटर आणि मोटर कंट्रोलरवर 8 वर्षे किंवा 1.5 लाख किमी वॉरंटी कंपनी देत ​​आहे. कंपनीचे म्हणणे आहे की आतपर्यंत BYD ATTO 3 कारच्या 2,500 युनिट्ससाठी बुकिंग झालं आहे.

BYD-ATTO 3 इलेक्ट्रिक कारमध्ये L2 एडवांस्ड ड्राइविंग असिस्टेंस सिस्टम (ADAS), BYD डिपॉयलट, 7 एअरबॅग्ज, पॅनोरॅमिक सनरूफ, 12.8-इंच अ‍ॅडॉप्टिव्ह रोटेटिंग सस्पेन्शन इलेक्ट्रॉनिक पॅड, 360° होलोग्राफिक ट्रान्सपरंट सिस्टीम, एनएफसी कार्ड की, मोबाइल पॉवर स्टेशन आणि इतर प्रमुख कॉन्फिगरेशन. कार अल्ट्रा-सेफ ब्लेड बॅटरी आणि बॉर्न ईव्ही प्लॅटफॉर्म (ई-प्लॅटफॉर्म 3.0) ने सुसज्ज आहे.

फास्ट चार्जिंग मोडमध्ये ही कार 50 मिनिटांत 0%-80% पर्यंत चार्ज होते. कारची उच्चतम क्षमतेची बॅटरी 60.48 kWh आहे. कार फक्त 7.3 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग पकडते.

मोबाईल पॉवर स्टेशनने सुसज्ज आहे कार..

BYD-ATTO 3 कार मोबाईल पॉवर स्टेशनने सुसज्ज आहे जी कारला सुपर पॉवर बँकमध्ये ट्रान्सफॉर्म करते. हे पॉवर स्टेशन 3.3kw पर्यंत पॉवर जनरेट करते, हे बहुतेक सगळ्या हाय व्होल्ट इलेक्ट्रिक उपकरणांच्या गरजा पूर्ण करण्यास समर्थ आहे.

BYD-ATTO 3 EV मध्ये मोबाईल वायरलेस चार्जिंग, वन-टच इलेक्ट्रिक कंट्रोल, NFC कार्ड की, 8-स्पीकर ऑडिओ सिस्टम, अडजेस्टेबल इलेक्ट्रिक सीट, व्हॉईस कंट्रोल, एलईडी हेडलॅम्प, एलईडी रीअर लाइट, मल्टी-कलर ग्रेडियंट अँम्बियंट लाइटिंग, म्युझिक प्लेबॅक ड्राइव्ह, PM 2.5 एअर फिल्टर, CN95 एअर फिल्टर हे देखील फीचर्स आहेत.

एवढे सगळे फीचर्स असलेली ही कार लवकरच भारतीय बाजारपेठेत धुमाकूळ घालणार असे दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *