Take a fresh look at your lifestyle.

Nissan ची ही पॉवरफुल SUV होणार लॉन्च; ह्युंदाई Creta, किया Seltos ला मिळणार जबरदस्त टक्कर, पहा डिटेल्स

0

ह्युंदाई क्रेटाला भारतीय बाजारपेठेत ग्राहकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. भारतीय बाजारपेठेत क्रेटाला खूप जास्त मागणी आहे. ह्युंदाईचे बाजारातील उंची वाढवण्यातही या वाहनाने मोठी मदत केली आहे. पण, निसानची एक अशी एसयूव्ही भारतीय बाजारपेठेत दाखल होणार आहे, जी क्रेटाची बाजारपेठ काबीज करू शकते. होय, निसानच्या या एसयूव्हीचे नाव आहे निसान कशकाई. ही एसयूव्ही लवकरच भारतीय बाजारपेठेत दाखल होऊ शकते. निसान इंडियाने 18 ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीतील त्यांच्या ग्लोबल ही माहिती दिली.

टेस्ट दरम्यान दिसली Nissan Qashqai

Nissan Qashqai आणि Juke भारतीय बाजारपेठेत लॉन्च होण्यासाठी सज्ज आहेत. या मिडसाईज एसयूव्हीची भारतामध्ये पब्लिक रोड टेस्टिंग झाली आहे. कारण ती क्स-ट्रेल च्या टेस्ट प्रोटोटाइप बरोबर दिसलीआहे. Nissan Qashqai 5-सीटर SUV ची एकूण लांबी 4,315mm असेल.

 ह्युंदाई Creta आणि किया Seltos सह या SUV नां देणार टक्कर..

जर कश्काई भारतीय बाजारपेठेत लॉन्च झाली, तर ती ह्युंदाई क्रेटा, किया सेल्टोस, मारुती सुझुकी ग्रँड विटारा आणि टोयोटा अर्बन क्रूझर हायराइडर यांसारख्या बाजारपेठेतील अनेक सर्वोत्तम कारसोबत आपल्याला कॉम्पिटिशन करताना पाहायला मिळेल.

कश्काईमध्ये मिळणार ई-पॉवर टेक्नॉलॉजी ?

मध्यम आकाराच्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये लवकरच स्ट्रॉंग हायब्रिड मॉडेल मिळणार अशी चिन्हे दिसत आहे. निसानच्या कश्काईमध्येही ई-पॉवर तंत्रज्ञान पाहता येईल. जपानी निर्मात्याने या वर्षाच्या सुरुवातीस सेल्फ-चार्जिंग ई-पॉवर हायब्रिड पॉवरट्रेनसह कश्काईच्या पोर्टफोलिओत भर घातली आहे. SUV ला स्टायलिश सी आकाराचे LED हेडलॅम्प आणि स्पोर्टी लूक देण्यात आला आहे.

काय असतील, फीचर्स ?

ही एसयूव्ही शहरी भागामध्ये ड्रायव्हिंगसाठी उत्तम आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये 12.3-इंच फ्लोटिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 10.8-इंच HUD, ऑटोमैटिक क्लाइमेट कंट्रोल, पॅनोरॅमिक सनरूफ, पॉवर फ्रंट सीट्स, पॉवर्ड टेलगेट, ADAS वर आधारित सुरक्षा वैशिष्ट्ये दिसून येतील.

Leave A Reply

Your email address will not be published.