Take a fresh look at your lifestyle.

ZP आरोग्य विभाग भरती : तरुणांनो, तयारीला लागा ! गट ‘क’ वर्गाच्या 10,000 नोकरभरतीचे सुधारित वेळापत्रक जाहीर, पहा, नवा शासन JR..

0

राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषदांमध्ये गट ‘क’ संवर्गातील सरळसेवेच्या कोट्यातील एकूण रिक्त पदांच्या 80% रिक्त पदे भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे. ही पदभरती 15 ऑगस्ट 2023 पर्यंत करण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय मंगळवारी जारी करण्यात आला. 

दरम्यान, जिल्हा परिषदेत सुमारे 10 हजार पदांची भरती होणार असल्याचे सांगण्यात आले. कोरोना महामारी नियंत्रणात आल्यानंतर दोन वर्षांनंतर म्हणजेच मे 2022 मध्ये जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील सर्व रिक्त पदे सर्व जिल्हा परिषदांनी पूर्वीप्रमाणेच जिल्हा निवड मंडळामार्फत जिल्हा स्तरावरच भरण्यास मान्यता देण्यात आली आहे.

त्यानुसार सप्टेंबर 2022 मध्ये शासनाच्या विविध विभागांनी सुधारित आकृतिबंध तयार करून वित्त विभागाच्या मान्यतेनंतर गट ‘ड’ वगळता उर्वरित रिक्त पदापैकी 80% पदे भरण्यास परवानगी दिली आहे.

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्य सरकारने 15 ऑगस्ट 2023 पूर्वी 75 हजार पदे भरण्याचा संकल्प सोडला आहे. त्याअंतर्गत राज्याच्या ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा परिषदेच्या गट ‘क’ संवर्गाची एकूण रिक्त पदापैकी 80% पदभरती करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय मंगळवारी जारी करण्यात आला आहे. यात राज्यातील 34 जिल्हा परिषदांमध्ये सुमारे 10 हजार नोकरभरती होणार असल्याचे सांगण्यात आले.

शासन गट ‘ड’ ची पदभरती राबवणार कंत्राटी पद्धतीने :-

या पदभातीबाबत जवळपास वाहनचालक व गट ‘ड’ पदाचे 2,500 पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे. या धोरणामुळे कर्मचारी संघटनांनी मोठा विरोध केल्याचं पाहायला मिळत आहे.

पहा आरोग्यविभाग भरतीचे सुधारित वेळापत्रक..

शासन निर्णयातील महत्वाच्या बाबी. . .

1. ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट – क मधील सर्व संवर्गाची (वाहनचालक व गट ड संवर्गातील पदे वगळून) सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या 80% मर्यादेपर्यंत रिक्त पदे भरण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. सदर मान्यता ही वित्त विभागाच्या निर्देशानुसार दि. 15 ऑगस्ट, 2023 पर्यंत लागू राहील.

त्यापुढील भरती प्रक्रिया वित्त विभागाच्या शासन निर्णय दि. 30 सप्टेंबर, 2022 नुसार सुधारित आकृतिबंध शासनाने मान्य केल्यावरच करता येईल.

2. जिल्हा परिषदांतील गट – क मधील सर्व संवर्गाची (वाहनचालक व गट – ड संवर्गातील पदे वगळून) रिक्त पदे संवर्गनिहाय आरक्षण नियमानुसार निश्चित करून जिल्हा परिषदांनी त्यांच्या स्तरावर जिल्हा निवड मंडळामार्फत भरण्याबाबत सुधारित कालबद्ध कार्यक्रम (परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक) निश्चित करण्यात येवून प्रपत्र- 1 मध्ये जोडण्यात आले आहे.

सदर कालबद्ध कार्यक्रमाचे सर्व जिल्हा परिषदांनी तंतोतंत पालन करावे. त्याकरिता रिक्त पदे (एकूण रिक्त पदांच्या 50% मर्यादेपर्यंत), त्यांची आरक्षण निश्चिती, उमेदवारी अर्ज मागविणे, (सदर परीक्षेच्या आयोजनासाठी कंपनी निवडणे आवश्यक असल्यास), परीक्षा घेणे (ऑनलाइन / ऑफलाइन) इ. तदनुषंगिक परीक्षा घेण्यासंबंधीची सर्व जबाबदारी ही जिल्हा निवड मंडळाची व जिल्हा परिषदेची राहणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.