‘या’ नेहमीच्या 2 चुकांमुळे तरुणांमध्ये मधुमेहाचं प्रमाण वाढलं, घरीच स्वतः ही टेस्ट घ्या, अन् ओळखा तुम्हाला मधुमेह आहे का ?
तुमचे शरीर नेहमी तुम्हाला येणाऱ्या संकटांबद्दल चेतावणी देत असते पण लोक त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात आणि नंतर आयुष्यभर पश्चात्ताप करतात. लंडनमधील एका अभ्यासात असेच काहीसे समोर आले असून, जिभेची चोचले पुरवण्यासाठी आरोग्याकडे दुर्लक्ष करताना तरुणांनी क्षणभरही विचार केला नाही असे दिसून येत आहे.
खरं तर तिथल्या लोकांच्या आहारात बदल व्हावा यासाठी खाद्यपदार्थांवर धोक्याची लेबले देखील लावण्यात आली होती, जसं की, बर्गरमधून कॅलरीज जाळण्यासाठी 20 मिनिटे चालावे लागते, कोल्ड ड्रिंक प्यायल्यानंतर 30 मिनिटे चालावे लागते. यामुळे लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलतील अशी अपेक्षा होती, पण आश्चर्याची गोष्ट आहे की, जास्त कॅलरी घेतल्याने लठ्ठपणाचा धोका आणि नंतर साखरेचं प्रमाण अनेक पटींनी वाढेल हे माहीत असूनही त्यांनी या इशाऱ्याची काळजी घेतली नाही.
ही स्थिती केवळ लंडनमधीलच नाही तर, संपूर्ण जगातील लोकांची आहे. सध्या भारतासह अमेरिका, चीन, जर्मनी अशा 10 बलाढ्य देशांमध्ये 84 लाख टाइप -1 मधुमेहाचे रुग्ण आहेत, जे येत्या काही काळामध्ये 20 दशलक्षांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. असं झाल्यास जगभरात कॅन्सरचा वेगही वाढू शकतो, कारण नुकत्याच झालेल्या आणखी एका अभ्यासानुसार, टाईप -1 मधुमेहामध्ये दररोज इन्सुलिन घेतल्याने कॅन्सरचा धोकाही वाढतो.
टाईप – 2 मधुमेह देखील आरोग्य तज्ञांसाठी डोकेदुखी बनला आहे, संपूर्ण जगात 53 कोटींहून अधिक प्रौढ व्यक्ती या आजाराने ग्रस्त आहेत, तर भारतात हा आकडा 80 दशलक्षांच्या जवळ आहे. देशात प्री-डायबेटिक लोकांची संख्या जवळपास तितकीच आहे, ज्यांना ही सीमारेषा ओलांडण्यापासून रोखणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी जनतेने स्वत:हून प्रयत्न करावेत अशी अपेक्षा आहे.यासाठी रुग्णांना जीवनशैली आणि आहार सुधारावा लागेल आणि योग-आयुर्वेदाचा अवलंब करून वाढलेली साखर आटोक्यात आणावी लागणार आहे.
टाइप – 1 मधुमेह सर्व वयोगटातील लोकांना होऊ शकतो, लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत. द लॅन्सेटने नुकत्याच केलेल्या एका अभ्यासात भारत, अमेरिका, चीन, जर्मनी यांसारख्या 10 देशांतील लोकांना टाइप-1 मधुमेहाचा धोका अधिक असल्याचे आढळून आले आहे. ज्यामुळे कालांतराने हृदय, रक्तवाहिन्या, डोळे, किडनी आणि नसा यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील. तसे, टाइप -2 मधुमेह हा सर्वात सामान्य मानला जातो.
The Lancet Diabetes and Endocrinology द लॅन्सेटच्या अहवालानुसार भारत, अमेरिका, ब्राझील, चीन, जर्मनी, स्पेन, कॅनडा, ब्रिटन, रशिया आणि सौदी अरेबिया या देशांमध्ये टाइप-1 मधुमेहाने ग्रस्त लोकांची संख्या सर्वाधिक आहे. या 2022 च्या अहवालानुसार, सध्या सुमारे 8.4 दशलक्ष लोक या आजाराच्या विळख्यात आहेत, जे 2040 मध्ये 13.5 दशलक्ष वरून 17.5 दशलक्ष पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. जाणून घ्या मधुमेहाची लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध उपाय काय आहेत.
मधुमेहाची लक्षणे :-
जास्त तहान लागणे.
वारंवार मूत्रविसर्जन होणे.
खूप भूक लागणे.
वजन कमी होणे.
चिडचिड होणे.
थकवा जाणवणे.
अशक्तपणा जाणवणे.
दृष्टी धूसर होणे.
जास्त साखर खाणं ‘या’ अवयवांसाठी आहे धोकादायक..
मेंदू
डोळा
हृदय
लिव्हर
किडनी
सांधे
सामान्य साखर पातळी किती असावी ?
जेवण करण्यापूर्वी 100 पेक्षा कमी
जेवण केल्यानंतर 140 पेक्षा कमी
मधुमेह होण्यापूर्वी
जेवण करण्यापूर्वी 100-125 mg/dl
जेवणानंतर 140-199 mg/dl
मधुमेह झाल्यानंतर..
जेवण करण्यापूर्वी 125 mg/dl पेक्षा जास्त
जेवणानंतर 200 mg/dl पेक्षा जास्त
मधुमेहाचे कारण..
ताण-तणाव
वेळेत न खाणे
जंक फूड
कमी पाणी पिणे
वेळेवर न झोपणे
लठ्ठपणा
अनुवांशिकता
रुग्णांनी हिवाळ्यात काय करावे ?
हिवाळ्यात आहाराकडे विशेष लक्ष द्यावे .
जास्त कॅलरी असलेले अन्न टाळावे.
कसरत करणे.
अर्धा तास उन्हात बसणे.
शरीरातील साखर कमी करण्यासाठी उपचार
रोज किमान 20 मिनिटे व्यायाम केल्यास साखरेचा धोका 60% कमी होतो त्यासाठी दररोज 20-25 मिनिटे व्यायाम करा
साखर किती खावी ?
रुग्णांनी 1 दिवसात 5 ग्रॅमपेक्षा जास्त साखर खाऊ नये
फक्त 5 ग्रॅम म्हणजे 1 चमचा साखर खावी.
साखर नियंत्रित कशी करावी ?
काकडी-टोमॅटोचा रस घ्या.
गिलॉय डेकोक्शन प्या.
मंडुकासन – योग मुद्रासन देखील फायदेशीर आहे.
15 मिनिटे कपालभाती करा
खाल्ल्यानंतर 1 तासानंतर पाणी प्या.
फक्त कोमट पाणी प्या.
सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्या.
भोपळ्याचे सूप, रस आणि भाज्या खा.
रोज 1 चमचा मेथी पावडर खा.
सकाळी लसूणच्या 2 पाकळ्या खा.
कोबी, कारले खा.
या 3 वनस्पती करतील साखरेवर नियंत्रण
कोरफड
स्टीव्हिया वनस्पती
कोस्टस इग्निस (इन्सुलिन) वनस्पती