आता मढ – वर्सोवा अंतर पार करता येणार 10 मिनिटांत! असा होणार दोन शहरांदरम्यान उड्डाणपूल, पहा रोड मॅप..
अंधेरी पश्चिम येथील महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील मढ – वर्सोवा प्रकल्पाला सीआरझेडची परवानगी मिळाल्याने या पुलाचा मार्ग मोकळा झाला आहे. मढ बेट – वर्सोवादरम्यान 22 किमीचे अंतर स्वामी विवेकानंद मार्गाने कापण्यासाठी 49 ते 90 मिनिटे इतका वेळ लागतो. मात्र, पूल सेवेत आल्यावर अवघ्या 10 मिनिटांत हे अंतर गाठता येणार आहे.
या पुलाच्या कामासाठी मुंबई महापालिकेकडून 700 कोटी रुपये खर्च केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. अंधेरीत 3 जुलै 2018 रोजी गोखले पूल कोसळून दोन जणांचा आणि 14 मार्च 2019 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील ‘हिमालय’ पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा बळी गेल्यानंतर मुंबईतील पुलांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला.
या दुर्घटनेनंतर महापालिकेने मुंबईतील सर्व पुलांचे नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट केले. ऑडिट अहवालातील शिफारसीनुसार, आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती आणि काही पूल पाडून नव्याने तर नागरिकांच्या मागणीनुसार काही पूल नवीन बांधण्यात येत आहेत. कोंडीवर उपाय येणार आहे. वाहतूक म्हणून मुंबईतील उड्डाणपुलांचे जाळे वाढवले जात आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरात मोठ्या प्रमाणात नवीन पुलांची उभारणी करण्यात येत आहे.
या पुलासह पी / उत्तर मालाडमधील धारिवली गाव येथील मार्वे रोडवरील पूल आणि के / पश्चिम आणि पी / दक्षिण गोरेगावच्या सीमेवर वाहनांसाठी भगतसिंग नगर गोरेगाव खाडीजवळ देखील पूल बांधण्यात मढ ते वर्सोवा थेट सार्वजनिक वाहतुकीचा एकमेव मार्ग म्हणजे फेरीसेवा आहे. मात्र, ही सेवा वर्षातून चार महिने बंद असते.
त्यामुळे मढ किंवा वर्सोवा येथे जाण्यासाठी पश्चिम द्रुतगती महामार्ग किंवा स्वामी विवेकानंद मार्ग असे दोन अन्य वाहतुकीचे पर्याय प्रवाशांसाठी उपलब्ध आहेत. काही वर्षांपासून नवीन पुलाची मागणी केली जात होती. मालाड पश्चिमेकडील मढ परिसर आणि अंधेरीतील वर्सोवा हा भाग सागरी किनारपट्टीने वेढलेला आहे.
त्यामुळे या भागांत प्रवासासाठी सागरी बोटीचा वापर होतो. ही जलवाहतूक अधिक जलद करण्यासाठी मढ ते वर्सोवा या जलवाहतूक पुलाचा पर्याय काढण्यात आला आहे. या पुलांसाठी महत्त्वपूर्ण असणारी सीआरझेड परवानगी मिळाल्यामुळे हा पूल बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दोन्ही भागांतील नागरिकांना मिळणार दिलासा मुंबईत बांधण्यात येणारे नवीन पूल वाहतूक कोंडी फोडण्यासाठी व वेगवान प्रवासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. मढ – वर्सोवा या नव्या पुलामुळे दोन्ही भागांतील नागरिक, विद्यार्थी, नोकरदार वर्ग, मच्छीमार बांधव, व्यावसायिकांना दिलासा मिळणार आहे.