1 फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोफत विजेसाठी सौर योजना जाहीर केली होती. आता या योजनेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोर्टल सुरू केले आहे. त्याचे नाव आहे – पीएम सूर्य घर: मुफ्त बिजली योजना. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून या योजनेची सविस्तर माहिती दिली आहे.
काय आहे ही योजना..
या नवीन योजनेची माहिती देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केले – 75,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक असलेल्या या योजनेचे उद्दिष्ट दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध करून 1 कोटी घरांना प्रकाश देणे आहे.
या योजनेअंतर्गत सबसिडीपासून ते मोठ्या सवलतीच्या बँक कर्जापर्यंत सर्व काही दिले जाणार आहे. जनतेवर खर्चाचा बोजा पडणार नाही याची काळजी सरकार घेणार आहे. सर्व पात्र भारतीयांना राष्ट्रीय ऑनलाइन पोर्टलशी जोडले असून त्यांना पुढील सर्व सुविधा मिळणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व निवासी ग्राहकांना, विशेषत: तरुणांना pmsuryagarh.gov.in वर अर्ज करून पीएम – सूर्य घर: मोफत वीज योजनेत सामील होण्याचे आवाहन केलं आहे.
दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज..
या योजनेचा लाभ एक कोटीहून अधिक कुटुंबांना मिळणार आहे. याअंतर्गत लाभार्थी कुटुंबाला दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज मिळणार आहे. या योजनेअंतर्गत जर घरांच्या छतावर सौर पॅनेल लावले तर सरकार आता 60% पर्यंत सबसिडी देणार आहे. या योजनेसाठी सुमारे 75,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या योजनेमुळे केवळ वीज बिल कमी होणार नाही तर ऊर्जा सुरक्षा, प्रदूषण कमी आणि रोजगार निर्मितीमध्येही वाढ होण्यास मदत होणार आहे.
किती मिळणार सबसिडी..
बातमी :- आता TATA 3 Kw सोलर सिस्टीमवर 60% पर्यंत सबसिडी !
PM सूर्योदय योजनेअंतर्गत अर्ज कसा करायचा ?
स्टेप 1 : सर्वप्रथम तुम्हाला https://pmsuryaghar.gov.in/ पोर्टलला भेट द्यावी लागेल. यानंतर तुम्हाला ‘apply for ruftop solar’ यावर क्लिक करावे लागेल.
यानंतर तुम्हाला येथे नोंदणी करावी लागेल. यासाठी तुम्हाला तुमची राज्य आणि वीज वितरण कंपनी निवडावी लागेल. त्यानंतर वीज ग्राहक क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि ईमेलची माहिती द्यावी लागेल.
स्टेप 2 : यानंतर तुम्हाला ग्राहक क्रमांक आणि मोबाइल नंबरसह लॉग इन करावे लागेल. लॉग इन केल्यानंतर, रूफटॉप सोलर फॉर्मद्वारे अर्ज द्यावा लागेल. proceed वर क्लिक करा.
स्टेप 3 : Discom कडून व्यवहार्यता मंजुरीची प्रतीक्षा करा. तुम्हाला व्यवहार्यता मंजूरी मिळाल्यास, तुम्ही तुमच्या डिस्कॉममधील कोणत्याही नोंदणीकृत विक्रेत्यांकडून प्लांट स्थापित करून घेऊ शकता..
स्टेप 4 : इंस्टॉलेशन पूर्ण झाल्यावर, प्लांट डिटेल्स सबमिट करा आणि नेट मीटरसाठी अर्ज करा.
स्टेप 5 : नेट मीटरची स्थापना केल्यानंतर आणि डिस्कॉमद्वारे पडताळणी केल्यानंतर, पोर्टलवरून एक कमिशनिंग प्रमाणपत्र तयार केले जाईल.
स्टेप 6 : कमिशनिंग अहवाल प्राप्त झाल्यानंतर, पोर्टलद्वारे बँक खात्याचे तपशील आणि रद्द केलेला चेक सबमिट करा. यानंतर, तुमची सबसिडी तुमच्या बँक खात्यात 30 दिवसांच्या आत प्राप्त होईल..
PM सूर्यघर योजनेचे अपडेट जाणून घेण्यासाठी