राष्ट्रीय बायोगॅस आणि सेंद्रिय खत व्यवस्थापन योजनेंतर्गत राज्यात 5,200 घरगुती बायोगॅसचे उद्धिष्ट असून अहमदनगर – 474, पुणे – 505 तर औरंगाबाद जिल्ह्यात 290 बायोगॅस बांधण्याचे उद्दिष्ट जिल्हा परिषद कृषी विभागाला देण्यात आले आहे. स्वयंपाकासाठी लागणारा गॅस बायोगॅसच्या माध्यमातून तर मिळतोच सोबतच सेंद्रिय खतही उपलब्ध होते. केंद्र सरकारच्या बायोगॅस आणि सेंद्रिय खत व्यवस्थापन योजनेंतर्गत लाभार्थ्याला 14 ते 29 हजार रुपये अनुदान देखील मिळणार आहे.
काय आहे नेमकी योजना ?
राष्ट्रीय बायोगॅस आणि सेंद्रिय खत व्यवस्थापन ही केंद्र सरकारची योजना आहे. पशुधन असलेल्या व्यक्तीला या योजनेंतर्गत अर्ज करता येईल. सेंद्रिय खताचा बायोगॅससाठी वापर करणे आणि या बायोगॅसचा ऊर्जा म्हणून वापर करून वृक्षतोड रोखण्याचा याद्वारे शासनाचा उद्देश आहे.देशातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही योजना पोहचवण्याचा सरकारचा मानस आहे.
राज्यात 5,200 घरगुती बायोगॅसचे उद्दिष्ट :-
राष्ट्रीय बायोगॅस आणि सेंद्रिय खत व्यवस्थापन योजनेंतर्गत घरगुती वापरासाठी राज्यात 5,200 बायोगॅस बांधण्याचे उद्दिष्ट असून शासनाकडून औरंगाबाद जिल्ह्यासाठी 290 प्राप्त झाले आहे. यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील 290 कुटुंबाना स्वच्छ इंधनाचा लाभ घेता येणार आहे.
अनुदानाच्या रक्कम किती ?
या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती आणि जमातीच्या लाभार्थ्यास 23,600 तर सर्व साधारण प्रवर्गातील लाभार्थ्यास 16315 रु. अनुदान मिळणार आहे. या योजनेसाठी इच्छुक उमेदवारांना तत्काळ अर्ज करता येणार आहे.
कसा करणार अर्ज ?
संबंधित पशुपालकाने आवश्यक कागदपत्रासह पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे अर्ज करावा. यासाठी उत्पन्नाची कोणतीही अट नसल्याने अधिक अर्ज आल्यास लकी ड्रॉ प्रमाणे लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे.
काय लागतील कागदपत्रे ?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे चार गाय, म्हेंस, बैल असे पशुधन असले पाहिजे. त्यासंबंधीचे ग्रामपंचायतचे प्रमाणपत्र, सातबारा आणि नंबर 8 अ चा उतारा, आधार, पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत इ. कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
राष्ट्रीय बायोगॅस आणि सेंद्रिय खत व्यवस्थापन योजनेंतर्गत बायोगॅस उभारून त्याचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना शासनाकडून अनुदान मिळणार आहे. यामुळे या योजनेत जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी सहभागी व्हावे. असे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी प्रकाश देशमुख यांनी पशशुपालकांना आवाहन केलं आहे.
कोणत्या जिल्ह्यासाठी किती आहे उद्धिष्ट :-
अहमदनगर : 474
पुणे : 505
सातारा : 240
सांगली : 191
कोल्हापूर : 897
सोलापूर : 246
औरंगाबाद : 290
उस्मानाबाद : 240
लातूर : 125