शेतीशिवार टीम : 13 ऑक्टोबर 2022 :– राज्यातील सामाजिक नाय विशेष साहाय्य विभागाच्या योजनेअंतर्गत 90% अनुदानावर दिल्या जाणाऱ्या मिनी ट्रॅक्टरच्या नवीन अर्जाच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण पाहणार आहोत.
मित्रांनो, समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून अनसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटासाठी मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदीसाठी 90% अनुदान दिलं जाणार आहे. यासाठी 15 ऑक्टोबर 2022 पूर्वी लाभार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून करण्यात आलं आहे. यासाठी लाभार्थ्यांना mini.mahasamajkalyan.in या वेबसाईटवर अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज कारावा लागणार आहे.
अर्ज करण्यासाठी स्वयंसहायता बचत गटातील किमान 80% सदस्य अनुसूचित जाती आणि नवबौद्ध् घटकातील असावेत, असे बचत गट या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील.
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांमधील सदस्य महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत. याप्रमाणे, बचत गटाचे अध्यक्ष,सचिव, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत.
अनुदान किती आणि कसे मिळणार ?
मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधने म्हणजे कल्टिव्हेटर किंवा रोटाव्हेटर व ट्रेलर खरेदी करण्यासाठी कमाल मर्यादा 3.50 लाख रुपये आहे, त्यामध्ये 10% हिस्सा बचत गटाला भरावा लागतो, तर प्रत्यक्ष किमतीच्या 90% म्हणजे 3 लाख 15 हजार रुपये अनुदान समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून दिलं जातं.
या योजनेअंतर्गत जर जास्त किमतीचा ट्रॅक्टर विकत घेतल्यास 3 लाख 15 हजार रुपये अनुदानाची कमाल मर्यादा असते. यामध्ये किमान 9 ते 18 अश्वशक्तीचा ट्रॅक्टरही खरेदी करता येऊ शकतो, परंतु अनुदान हे 3 लाख 15 हजार रुपये जास्तीत जास्त असणार आहे. तर 3.50 लाख रुपयांच्या क्षमतेमध्ये अनुदानाचे वितरण केलं जाणार आहे.
यासाठी स्वसहाय्यता बचतगटांना राष्ट्रीयकृत बॅंकेत बचत गटाच्या नावे खाते उघडून खात्याची माहिती देणं गरजेचं असणार आहे. यामध्ये पहिल्या हप्त्याचे अनुदान ट्रॅक्टर आणि उपसाधनांची खरेदी करून पावती जमा केल्यानंतर दिलं जातं. तर उर्वरित RTO ची नोंदणी झाल्यानंतर 50% अनुदान दिलं जातं. यानंतर ट्रॅक्टरवर समाज कल्याण विभागाची पाटी लावणे बंधनकारक आहे.
ही योजना राज्यभर राबवली जाते, परंतु सध्या नांदेड जिल्ह्याचे अर्ज सुरु झाले आहे तर मित्रांनो, तुम्ही नांदेड जिल्ह्याचे असाल तर http://mini.mahasamajkalyan.in/register.aspx या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करू शकता…
अर्ज करण्याचे व लाभाचे मुख्य टप्पे :-
टप्पा 1 :- ऑनलाइन अर्ज सादर करणे
बचत गटाची व सदस्यांची संपूर्ण अचूक माहिती भरून अर्ज ऑनलाइन सादर करणे.
टप्पा 2 :- सारांश प्रिंट सादर करणे
आपण सादर केलेला अर्ज वैध झाल्यास या अर्जाची सारांश प्रिंट सर्व सभासदांच्या स्वाक्षरीने प्रमाणित करून ऑनलाइन सादर करावी.
टप्पा 3 :- लाभार्थी निवड
वैध झालेल्या सर्व अर्जामधून चिठ्ठी च्या मदतीने लाभार्थ्यांची निवड केली जाईल .
टप्पा 4 :- बिलाची पावती सादर करणे
लाभार्थ्यांनी खरेदी केलेय साहित्याची व वाहनाची पावती ऑनलाइन सादर करणे. सादर केलेल्या पावतीवर विक्रेत्याचा GST क्रमांक, पावती क्रमांक, खरेदी दिनांक, वाहनाचा चेसीस क्रमांक, उप साधनांचे अनु क्रमांक, इत्यादी विस्तृत तपशील असणे गरजेचे आहे. मूळ (ओरीजनल) खरेदी पावती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यांच्या कार्यालयात जमा करणे बंधनकारक आहे.
टप्पा 5 : वाहन परवाना सादर करणे
लाभार्थ्यांनी खरेदी केलेल्या वाहनाचा RTO मार्फत मिळणारा वाहन परवाना ऑनलाइन सादर करणे. मूळ (ओरीजनल) वाहन परवाना सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यांच्या कार्यालयात जमा करणे बंधनकारक आहे.