BREAKING : महाराष्ट्र (PDF) मतदार यादी : 2022 । निवडणूक आयोगाकडून नव्या मतदार याद्या प्रसिद्ध । ‘या’ ॲप-द्वारे शोधा तुमचं नाव !

1

शेतीशिवार टीम : 5 जुलै 2022 :- महाराष्ट्र राज्यातील ज्या लोकांना येत्या महानगरपालिका / जिल्हा परिषदा निवडणुकीत मतदान करायचं आहे, तर तुम्ही करू शकता कि नाही याची माहिती तुम्हाला तर महाराष्ट्र मतदार यादी 2022 मध्येच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला मतदार यादी पाहावी लागेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला Maharashtra CEO Voter List 2022 बद्दल माहिती हवी असेल तर ही पोस्ट फक्त तुमच्यासाठी आहे…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या अंतिम मतदार यादीत नाव शोधण्यासाठी ऐनवेळी धावपळ होऊ नये यासाठी ‘ टू व्होटर मोबाईल ॲप ‘ची सुविधा आता उपलब्ध झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी दिली आहे.

मतदार, उमेदवार, राजकीय पक्ष आणि निवडणूक यंत्रणेच्या सोयीसाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदार याद्यांमधील नवे शोधण्यासाठी / नावांत काही चुका असतील तर त्या हरकतींसाठी तसेच ‘New Voter ID’ साठी ‘ट्रू व्होटर ‘ (True Voter Mobile App) विकसित केलं आहे. याबद्दल अधिक माहिती आपण खाली पाहणार आहोत…

राज्यभरातील विविध 14 महानगरपालिकांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांत नाव शोधण्याची सुविधादेखील अलीकडे उपलब्ध करून देण्यात आली होती. त्याचबरोबर आपल्या नावासंदर्भात काही हरकती किंवा सूचना असल्यास त्याही या ॲपद्वारे नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती, असेही राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी सांगितले.

टू – व्होटर मोबाईल ॲपमुळे मतदारांनी स्वतः प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीत आपली नावे शोधली व त्यावरील हरकती आवश्यक कागदपत्र व पुराव्यासह स्वतः च नोंदवल्या. केवळ तीन ते चार दिवसांत असे आक्षेप नोंदवणाऱ्यांची संख्या 10 हजार 770 इतकी होती. त्याचबरोबर या कालावधीत सुमारे 30 लाखांपेक्षा जास्त मतदारांनी आपले नाव शोधण्यासाठी या ॲपचा वापर केला .

त्यासाठी जवळपास 2 लाखांपेक्षा जास्त मतदारांनी हे ॲप आपल्या मोबाईलवर इन्स्टॉल केलं असून दिवसेंदिवस संख्या वाढत आहे. त्यामुळे तुम्हाला जर येत्या निवडणुकीत मतदान करायचं असेल तर निवडणुकांच्या प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्यांमध्येही या ॲपच्या माध्यमातून आपले नाव शोधता येईल ते आपण पाहूया…

महाराष्ट्र मतदार यादी 2022 । मतदार यादीत नाव कसे शोधाल ? 

सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोअर वर जाऊन या लिंकच्या माध्यमातून किंवा TrueVoter या लिंकच्या माध्यमातून तुम्ही डाउनलोड करू शकता…

या नंतर पहिल्याच पेज वर तुम्हाला ‘Voter List Search’ या ऑप्शनवर क्लिक करा.

यानंतर ‘Search Your Name In Voter List’ ओपन होईल. यानांतर General Search मध्ये तुमचं नाव, जिल्हा, मतदारसंघ निवडा आणि Search वर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला तुमचा EPIC Id दिसेल. त्यावर तुमचं नाव / वय / गाव / SR no. / पत्ता दिसेल. त्याखाली तुम्ही तुमची फॅमिली डिटेल्स काढू शकता…

महाराष्ट्र मतदार यादी 2022 डाउनलोड करण्याची प्रोसेस…

सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र मतदार यादीच्या ऑफिशियल वेबसाइट वर जावं लागेल. यानंतर वेबसाइटचे होम पेज तुमच्या समोर उघडेल.

वेबसाइटच्या होम पेजवर, मतदार यादीमध्ये नाव शोधा म्हणजे Find Name in Voter List  हा ऑप्शन दिसेल त्या बाजूला तुम्हाला क्लिक करावं लागेल.

त्यानंतर पुढील पेजवर तुम्हाला राज्यातील सर्व जिल्हे दिसतील, जिल्ह्यांपैकी तुमच्या जिल्ह्यावर क्लिक करावं लागेल.

मग तुमचा विधानसभा मतदारसंघ भाग. (Assembly constituency Part)  इ, माहिती भरावी लागेल. तिथे तुमची योग्य माहिती भरा.

माहिती दिल्यानंतर तुम्हाला ओपन पीडीएफ PDF या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.

आता तुम्ही येथून Maharashtra CEO Voter List PDF DOWNLOAD करू शकता आणि यादीत तुमचे नाव देखील पाहू शकता.

घरबसल्या मोबाईलवर ऑनलाईन नवीन Voter ID बनवा… 

Voter ID बनवण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या अधिकृत वेबसाइट https://www.nvsp.in/ वर जा…

येथे ‘नवीन मतदार रजिस्ट्रेशनसाठी Register as a New Elector/Voter हे पेज दिसेल.

यानंतर समोर आलेला फॉर्म भरा. या फॉर्ममध्ये तुम्हाला नाव, पत्ता, जन्मतारीख इत्यादी माहिती द्यावी लागेल.

ही सर्व माहिती दिल्यानंतर तुम्हाला कागदपत्रांची गरज भासेल. तुम्हाला जन्मतारीख, पत्ता इत्यादींच्या पुराव्यासाठी कागदपत्रं अपलोड करावी लागतील.
ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सबमिटवर क्लिक करा.

यानंतर जो ईमेल आयडी तुम्ही दिला असेल त्यावर मतदान ओळखपत्रासाठी लिंकसोबत एक ईमेल येईल.

याद्वारे तुम्ही मतदान ओळखपत्राचे स्टेट्स पाहू शकता व तुम्हाला एक महिन्याच्या आत हे कार्ड घरी पोस्टाद्वारे येईल.

1 Comment
  1. […] निवडणूक आयोगाकडून नव्या मतदार याद्या प्रसिद्ध । मतदार यादीत आपलं नाव शोधण्यासाठी तसेच मतदार यादी 2022 डाउनलोड करण्याची प्रोसेस व नोंदणी करण्यासाठी :- इथे क्लिक करा […]

Leave A Reply

Your email address will not be published.