June 2022 : भारतात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या Cars मध्ये Wagon R नंबर वन, तर Nexon ? पहा, टॉप 10 लिस्ट…
शेतीशिवार टीम : 5 जुलै 2022 :- जून 2022 मध्ये भारतातील लोकांना मारुती सुझुकीच्या Cars ला अधिक पसंती दिली आहे. सेलिंगच्या मते, टॉप 10 कार मध्ये ह्युंदाई आणि टाटाचे फक्त एक मॉडेलचं टॉप 10 मध्ये आलं आहे. अशी आठ मॉडेल्स आहेत, जी फक्त मारुती सुझुकीची आहेत.
यापैकी Wagon R ही ग्राहकांनी सर्वाधिक पसंती दिली. Wagon R विकत घेतलेल्या ग्राहकांनी सांगितले की, ही कार पूर्वीपेक्षा चांगली डिझाइन आणि पॉवरसह पुन्हा लॉन्च करण्यात आली आहे. त्यामुळे एकाच महिन्यात या Cars चे 16,814 कार विकल्या गेल्या. दुसरीकडे, Tata Nexon ने 14,614 आणि Hyundai Creta ने 10,973 युनिट्स विकल्या…
पहा टॉप 10 लिस्ट :-
10) मारुती सुझुकी Brezza :- 10130
9) मारुती सुझुकी Eeco :- 10,221
8) ह्युंदाई Creta :- 10,973
7) मारुती सुझुकी Dezire :- 11,603
6) मारुती सुझुकी Ertiga :- 12,226
5) मारुती सुझुकी Alto :- 12,933
4) मारुती सुझुकी Baleno :- 13,970
3) मारुती सुझुकी Swift :- 14133
2) टाटा Nexon :- 14,614
1) मारुती सुझुकी Wagon R :- 16,814
मारुती सुझुकीवरचं लोकांचा विश्वास :-
मारुती सुझुकीच्या Brezza, Eeco, Dzire, Ertiga, Alto, Baleno, Swift या गाड्याही लोकांना आवडल्या. या सर्व कारच्या 10000 हून अधिक युनिट्सची विक्री झाली आहे.
मारुती सुझुकीच्या कारच्या मेंटेनन्समध्ये फारसा खर्च येत नाही, असे ग्राहकांचे मत आहे. ह्या गाड्या कुठेही खराब झाल्या तर त्याचे पार्ट्स कोणत्याही पार्ट्सच्या दुकानात मिळतात. सर्व्हिस सेंटरमध्ये त्याच्या सर्व्हिसिंगसाठी जास्त खर्च येत नाही. पार्टस मजबूत असल्याने, ते अनेक वर्षे ते चालत राहतात..