आज केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात भूजल पातळी धोक्यात आली आहे. जमिनीतील पाण्याची खालावलेली पातळी, उत्पादकता वाढीसाठीचे नियोजन, पाण्याच्या अतिवापरामुळे नापीक झालेली जमीन, यावर आता ठिबक सिंचन हे शाश्वत पर्याय ठरत आहे. यासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी विकास योजना व मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन या दोन योजनांतून लाभार्थ्यांना 90% पर्यंत म्हणजेचं जवळपास हेक्टरी 1 लाखापर्यंत अनुदान मिळतं. त्यानुसार पुणे जिल्ह्यात यंदा 13,500 जणांचे अर्ज मंजूर केले असून सुमारे 8,000 शेतकऱ्यांना 23 कोटी रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे.
या योजनेअंतर्गत लॅटरल अंतरानुसार अनुदान दिलं जातं. 1 हेक्टर ठिबक सिंचनसाठी 80% अनुदान धरलं तर 1,2001 रुपये तर तुषार सिंचनासाठी 19,355 हजारापर्यंत दिलं जातं. तुम्हाला याबाबत सविस्तर माहिती त्यामध्ये खर्च मर्यादा, लॅटरल अंतरानुसार अनुदान, अर्ज करण्यासाठी स्टेप बाय स्टेप प्रोसेस दिली आहे ती खाली दिली आहे.
आठ हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ..
पुणे जिल्ह्यात 2022-23 या आर्थिक वर्षांत ठिबक सिंचन या प्रकारामध्ये 13,552 शेतकऱ्यांनी अर्ज केला होता. त्यापैकी 11 हजार 130 शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड केली गेली होती. तर 6,308 जणांना 18 कोटी 13 लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले. तर तुषार सिंचन प्रकारात 2,895 शेतकऱ्यांनी या योजनेच्या लाभासाठी अर्ज केले होते. त्यापैकी 2,414 शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड करून 1,669 शेतकऱ्यांना 4 कोटी 84 लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले.
कमी पाण्यात भरपूर उत्पादन..
राज्यात पावसाच्या अनियमिततेमुळे व शेती व इतर उद्योगांसाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा चालू आहे. यामुळे पाण्याची पातळी अत्यंत खालावली आहे. त्यामुळे भविष्यात केवळ शेतकऱ्यांनाच नाही तर सर्वांनाच पाण्याचे काटेकोर नियोजन करावे लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याना कमी शेतजमिनीत जादा उत्पादन घेता येणार येईल.
2 हेक्टरपेक्षा जास्त शेती असणाऱ्यांना, 75% अनुदान
ज्या शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरपेक्षा जास्त जमीन आहे, अशा सर्वसाधारण शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून 75% अनुदान दिले जाते. तर अनुसूचित जाती व जमातीमधील दोन हेक्टरपेक्षा जास्त जमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी 90% अनुदान दिले जाते.
90% अनुदान कोणाला ?
राष्ट्रीय कृषी विकास, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन या दोन योजनांच्या माध्यमातून अनुसूचित जाती व जमातीमधील अल्प तसेच अत्यल्प भूधारकांसाठी 90% अनुदान देण्याची सोय महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून केली जाते. तर सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यासाठी हेच अनुदान 80 टक्के इतके असते.
कसा कराल अर्ज ?
राष्ट्रीय कृषी विकास योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर ठिबक व तुषार योजनेचा ऑनलाइन अर्ज सादर करावा लागतो. शेतकरी स्वतः देखील या योजनेसाठी अर्ज करू शकतात. यासाठी संपूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत अर्ज कसा कराल ?
एकट्या पुणे जिल्ह्यात 2022-23 साठी 3,749 लाभार्थींनी याबाबतचे बिल संकेतस्थळावर अपलोड केले आहे. त्यापैकी 3,420 लाभार्थ्यांची स्थळ तपासणी देखील झाली आहे. एकूण 92 टक्के स्थळ तपासणी झाली असल्याने पुणे जिल्हा राज्यात स्थळ तपासणी करण्यात प्रथम क्रमांकावर विराजमान आहे. असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष काटकर यांनी सांगितलं.