Take a fresh look at your lifestyle.

देशातला सर्वात मोठा सागरी पूल महाराष्ट्रात, अंतर 22Km तर खर्च 17,843 कोटी, कधी कराल प्रवास, किती असणार टोल ? पहा रोडमॅप..

0

महाराष्ट्राची राजधानी मुंबई ते नवी मुंबईला जोडणारा देशातील सर्वात मोठा प्रोजेक्ट म्हणजे MTHL अर्थात मुंबई ट्रान्स हार्बर लिंक. हा देशातील सर्वात मोठा सी लिंक म्हणजे समुद्रातून जाणार सर्वात मोठा 6 लेन प्रवेश-नियंत्रित सागरी पूल ठरणार आहे. हा सी लिंक एकूण 21.8 Km लांबीचा असणार असून शिवडी – न्हावाशेवा असा जोडण्यात येणार आहे.

मुंबई आणि नवी मुंबई दरम्यान कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी मुंबई ट्रान्सहार्बर सी लिंक बांधण्यात येत आहे. हा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक ऑगस्ट 2023 मध्ये पूर्ण होणार आहे.

MMRDA कडून मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या 21.8 Km च्या शिवडी ते न्हावा-शेवापर्यंतच्या सी लिंकचे काम अविरतपणे सुरू आहे. प्राधिकरणाने कोणत्याही परिस्थितीत हा पूल लवकरात लवकर पूर्ण करण्याचा चंग बांधला आहे. या पुलावरून प्रवास करण्यासाठी वाहनधारकांडून दोन टप्प्यात टोल वसूल केला जाणार आहे. या पुलावरून प्रवास करण्यासाठी एका कारला 240 रुपये तर मल्टी ॲक्सल वाहनांसाठी 780 रुपये टोल भरावा लागणार आहे.

या टोल आकारणीसाठी पहिला टप्पा शिवडी ते शिवाजीनगर असा असणार आहे, तर दुसरा टप्पा शिवाजीनगर ते चिर्ले जंक्शन असा असेल, अशी माहिती पुलाच्या तिमाही अहवालात MMRDA कडून देण्यात आली आहे. पुलावरून 2023 मध्ये दररोज 39,300 वाहने तर 2026 पर्यंत 55 हजार वाहने दरराेज धावतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

L&T आणि Tata Projects द्वारे हा प्रोजेक्ट पूर्ण केला जाणार असून Mumbai Trans Harbour Link (MTHL) हा भारतातील सर्वात लांब समुद्री पूल असणार आहे. या पुलाच्या बांधकामाचा एकूण खर्च 17,843 कोटी रुपये असून या बांधकामासाठी जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी (JICA) द्वारे वित्तपुरवठा केला जात आहे.

वाशी पुलावरील भार होणार कमी..

शिवडी – न्हावा – शेवा सी लिंक सुरू झाल्यानंतर सध्याच्या वाशी खाडी पुलावरील मोठा भार कमी होणार आहे. या सी लिंकमुळे वाशी पुलावरील भार 2022 मध्ये 10% तर 2026 मध्ये तो 16 टक्क्यांहून कमी होईल, असा अंदाज शिवडी ते शिवाजीनगर असा असणार आहे, तर दुसरा टप्पा शिवाजीनगर ते चिर्ले जंक्शन असा असेल, अशी माहिती पुलाच्या तिमाही अहवालात MMRDA कडून व्यक्त करण्यात आला आहे.

CCTV ने लेस असणार सी लिंक :-

सुरक्षेच्या दृष्टीने पुलाच्या दोन्ही बाजूला प्रत्येक एक किलोमीटर अंतरावर अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. याशिवाय आपत्कालीन स्थितीमध्ये तत्काळ कॉल बॉक्स देखील लावण्यात येणार आहेत. या सी लिंकवर रोख आणि आटोमॅटिक अशा दोन्ही पद्धतीने टोल वसूल करण्याची सोय असणार आहे.

शिवाय वाहनचालकांच्या मदतीसाठी ठिकठिकाणी डिस्प्ले बोर्ड लावण्यात येणार असून ते एका ऑप्टिकल फायबर केबलद्वारे नियंत्रण कक्षास जोडण्यात येणार आहे. अश्याप्रकारे सर्व अत्याधुनिक सोयीसुविधांनी लेस असा हा भारतातील पहिलाच सी लिंक असणार आहे.

हा प्रकल्प दिलेल्या वेळेत पूर्ण होईल अशी अपेक्षा MMRDA कडून व्यक्त केली जात आहे. गेल्या वर्षी भारतात लॉकडाऊन होते, अश्या परिस्थितीत देखील मुंबईतील अनेक मोठे उड्डाणपुलाचे बांधकाम थांबवले गेले नाही. त्यामुळे या बांधकामाची गती कायम राहिली. शिवडी – न्हावा – शेवा सी लिंकच्या विरोधात कोर्टात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये किनारपट्टीच्या नियामक क्षेत्रांच्या उल्लंघनाचा (Coastal Regulatory zone) आरोप करण्यात आला आहे, परंतु असे असूनही बांधकामाच्या कामाच्या गतीवर फारसा परिणाम झालेला दिसून येत नाही.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा मुंबईच्या हार्बरवर 6 लेनचा एक्स्प्रेस वे पूल असेल आणि शिवडी मडफ्लॅट्स, पीर पौळ जेट्टी आणि ठाणे खाडी वाहिन्यांवरून जाईल. शिवडी-वरळी एलिव्हेटेड कॉरिडॉर आणि ईस्टर्न फ्रीवे यांना जोडण्यासाठी शिवडी-एन्डवर 3 – लेव्हल इंटरचेंजची योजना आहे. नवी मुंबईच्या टोकावर, शिवाजी नगर आणि चिर्ले येथे पुलावर प्रत्येकी एक इंटरचेंज असणार आहे.

या काँक्रीट पुलाच्या खालून जहाजांना जाण्यासाठी मध्यभागी 4Km चा स्टील स्पॅन विभाग असेल. MTHL चा सर्वात लांब अंतर 180m असेल आणि सर्वात लहान 100m लांब असेल. MTHL च्या लेनची रुंदी 3.5 मीटर असेल आणि दोन्ही बाजूला 2.5 मीटर रुंद अंतर असेल आणि मध्यभागी 0.75m अंतर असेल, JICA च्या शिफारसीनुसार. कमाल वेग मर्यादा 100 किमी प्रतितास इतकी आहे.

या सी लिंकचे काम पूर्ण झाल्यानंतर येत्या वर्षात या रस्त्यावर कोणत्या व किती गाड्या धावतील हे पाहुयात..

छोटी अवजड वाहने – 2,200
मोठी अवजड वाहने – 3,000
मल्टी ॲक्सल वाहने – 4,600
कार – 24,100
टॅक्सी – 2,700
बस – 2,700

Leave A Reply

Your email address will not be published.