Take a fresh look at your lifestyle.

गरिबांची भाकरी महागली ! ज्वारीच्या दरांत प्रति किलो 12 रुपयांची रेकॉर्डब्रेक वाढ, पहा, आजचे ज्वारी बाजारभाव..

0

गरिबांची हक्काची समजली जाणारी ज्वारी आता महागली असून, दोन महिन्यांत तब्बल प्रतिकिलोस बारा रुपयांनी ज्वारी महागली आहे. परिणामी, गरिबांना महागाईचे चटके जाणवू लागले आहेत. किरकोळ बाजारात गावराण ज्वारी 45 ते 55 रुपये तर दुरी ज्वारी 40 ते 45 रुपये प्रतिकिलोने विक्री केली जात आहे .

नगर जिल्ह्यातील खर्डा, जामखेड, सोलापुरातील करमाळा, बार्शी, जळगाव, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून ज्वारीची आवक होते. विशेषतः जामखेड, खर्डा आणि करमाळा येथून ज्वारीची मोठ्याप्रमाणात आवक होते.

गेल्या वर्षीपेक्षा यंदा ज्वारीची पेरणी कमी झाल्यामुळे ज्वारीचे उत्पादन कमी आहे. तसेच कर्नाटक राज्यातून येणारी दुरी ज्वारी तेथील स्थानिक प्रशासनाने 2 हजार 970 प्रतिक्विंटल या दराने जागेवरच खरेदी केल्यामुळे तेथील ज्वारी महाराष्ट्रात विक्रीस आली नाही तसेच दिवाळी दरम्यान येणाऱ्या महाराष्ट्रातील खान्देशातील दुरी ज्वारीची पेरणी यंदा अवघी 40% इतकीच झाली होती.

बहुतांश शेतकऱ्यांनी मका आणि कापूस या पिकांचीच पेरणी केली होती. मात्र, पावसामुळे दुरी ज्वारी तब्बल 80 ते 85% इतकी खराब झाली आहे. आंध्र प्रदेशातील नंदियाल या दुरीचे नवीन पीक जानेवारी महिन्यात येणार असून, तोपर्यंत इतर कुठलीही नवीन आवक होणार नसल्याने गेल्या दीड महिन्यात ज्वारीच्या भावात तब्बल 1200 रुपये प्रतिक्विंटल इतकी वाढ झाली आहे. आगामी काळातही ज्वारीच्या भावात वाढहोण्याची चिन्हे आहेत.

यंदा गावराण आणि दुरी ज्वारीच्या भावातही उच्चांक पाहायला मिळण्याची शक्यता आहे. गावराण ज्वारी ही बार्शी, जामखेड, करमाळा येथून आवक होते. दुरी ज्वारीची जळगाव, कर्नाटकातील सिधनूर आणि आंध्र प्रदेशातील नंदियाल येथून आवक होते. नवीन माल बाजारात येईपर्यंत तुटवडा राहणार असून भावामध्ये आणखी वाढ होण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

दरवर्षी गोकुळाष्टमीला होणारी ज्वारीची पेरणी यंदा दिवाळीपर्यंत लांबलेल्या पावसामुळे तब्बल दीड महिने उशिरा झाली. परिणामी, नवीन गावरान ज्वारीचे पीक मार्च अखेर अथवा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येणार आहे. खान्देशातील नवीन दुरी ज्वारी यंदा अवघी चाळीस टक्के पेरणी झाली होती. त्यातही अवकाळी पावसामुळे दर्जा खालावला आहे . तसेच सिंधनूर आणि नंदियाल नवीन दुरी डिसेंबर अखेर येणार आहे. त्यामुळे भाव तेजीतच राहतील –

राजू रायसोनी , ज्वारीचे व्यापारी , पुणे

ज्वारीचे क्विटलमध्ये भाव. . .

ज्वारीचा प्रकार – 2021   –    2020
गावराण –    3000-3500  – 4100-5000
दुरी –        2400-2500  –   3500-3600

Leave A Reply

Your email address will not be published.