वर्ष संपत आलं, मात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी येणाऱ्या आनंदाच्या बातम्या काही थांबायचं नाव घेत नाहीयेत. सर्वसामान्यांसाठी वाढती महागाई ही डोकेदुखी ठरत असली तरी यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मात्र फायदा होताना दिसत आहे. हेच कारण आहे की, महागाई भत्त्यात पुन्हा एकदा प्रचंड वाढ होऊ शकते.
सध्याच्या महागाईच्या आकडेवारीवरून तर हेच दिसून येत आहे. तसं पाहिलं तर, मध्यंतरी AICPI निर्देशांकाच्या डेटामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. याचा आधारावर कर्मचाऱ्यांना 2023 मध्ये हे नवीन गिफ्ट मिळणार आहे.
महागाई भत्त्यात पुढील वाढ जानेवारी 2023 मध्ये केली जाणार आहे. औद्योगिक कामगारांसाठी महागाईचे आकडे असे दर्शवतात की DA हा 4 टक्क्यांनी वाढू शकतो. सद्यस्थिती पाहता महागाई भत्त्यात चांगली वाढ होईल, असे तज्ज्ञांचेही मत आहे.
महागाई भत्ता (DA) पोहोचू शकतो 42 टक्क्यांपर्यंत ?
केंद्रीय कर्मचाऱ्यांना पुढील वर्षी महागाई भत्त्याची भेट मिळणार आहे, हे तर नक्की आहे. याची अंमलबजावणी ही जानेवारी 2023 पासून लागू होईल.मात्र, त्याची घोषणा मार्च 2023 मध्ये होळीच्या आसपास केली जाईल. 4 टक्क्यांच्या वाढीसह, महागाई भत्ता 42 टक्क्यांवर पोहोचेल. किमान मूळ वेतनात दरमहा एकूण 720 रुपयांची वाढ होणार असून, कमाल वेतन श्रेणीसाठी दरमहा 2276 रुपये वाढतील.
कामगार मंत्रालयाने अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक – औद्योगिक कामगार (AICPI) ची आकडेवारी जाहीर केली आहे. यानुसार सप्टेंबरमध्ये हा आकडा 131.2 इतका होता. AICPI निर्देशांक जूनच्या तुलनेत सप्टेंबर 2022 पर्यंत एकूण 2.1 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या महिन्यातील निर्देशांकात ऑगस्टच्या तुलनेत 1.1 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
2022 च्या सहामाहीपासून DA जोडला जाणार. . .
दुसऱ्या सहामाहीतील, AICPI निर्देशांकाची संख्या जानेवारी 2023 मध्ये महागाई भत्ता किती वाढेल हे ठरवेल. डिसेंबर 2022 पर्यंतच्या आकडेवारीच्या आधारे महागाई भत्ता वाढेल. दरम्यान सप्टेंबरपर्यंतची आकडेवारी समोर आली आहे. DA दर 6 महिन्यांनी रीवाईज केला जातो. पहिला जानेवारीपासून आणि दुसरा जुलैपासून लागू होईल. जानेवारी 2023 मधील वाढ डिसेंबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार असेल. मार्च 2023 मध्ये होळीच्या आसपास त्याची घोषणा केली जाईल. केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या 38% दराने महागाई भत्ता मिळत आहे.
पगारात किती पडणार फरक ?
जर तुमचे किमान वेतन 18,000 रुपये असेल तर…
1. कर्मचार्याचे मूळ वेतन – 18,000 रु.
2. नवीन महागाई भत्ता (42%) – 7560रु ./ महिना
3. आतापर्यंत महागाई भत्ता (38%) – 6840 रु./ महिना
4. महागाई भत्ता वाढला – 7560-6840 = 720रु./महिना
5. वार्षिक पगारात वाढ – 720X12 = 8640रु.
जास्तीत जास्त पगार 56900 रुपये असेल तर…
1. कर्मचार्याचे मूळ वेतन – रु 56900
2. नवीन महागाई भत्ता (42%) – रु 23898/महिना
3. आतापर्यंतचा महागाई भत्ता (38%) – रु 21622/महिना
4. महागाई भत्ता वाढला – 23898-21622 = रु 2276/महिना
5. वार्षिक पगारात वाढ – 2276X12 = रु. 27312
टीप: हा अंदाजे पगार आहे, HRA सारखे भत्ते जोडल्यानंतरच फायनल सॅलरी मोजता येईल. .