Take a fresh look at your lifestyle.

आता तुमची मनपसंद स्विफ्ट येणार नव्या ढंगात, मिळणार 40Km पर्यंत मायलेज; पहा, अशी असणार न्यू स्विफ्ट..

0

भारतात वाहन खरेदी करताना एक प्रश्न हमखास विचारला जातो तो म्हणजे गाडी मायलेज किती देते ? पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती पाहून, कार कंपन्या न्यू टेक्नॉलॉजीवर काम करत आहेत. मारुती सुझुकी ही एकमेव कार कंपनी आहे जी पेट्रोल कार असो किंवा सीएनजी दोन्ही व्हेरियंटमध्ये सर्वाधिक मायलेज देण्याचे सामर्थ्य ठेवते.

पण आता कंपनी आपली न्यू जनरेशन स्विफ्ट आणि डिझायर मध्ये एक खास टेक्नॉलॉजीने लॉन्च करण्याच्या तयारीत आहे, त्यानंतर मारुतीच्या या दोन्ही कारचे मायलेज प्रचंड वाढणार आहे. जाणून घेऊया या नवीन टेक्नॉलॉजीबद्दल..

स्ट्रॉंग हायब्रिड टेक्नॉलॉजी :-

मारुती सुझुकी आता स्ट्राँग हायब्रीड टेक्नॉलॉजी स्विफ्ट आणि डिझायर मध्ये समाविष्ट करणार आहे, हीच टेक्नॉलॉजी ग्रँड विटारामध्ये देखील समाविष्ट करण्यात आली आहे, ज्यामुळे ही SUV सुमारे 28Kmpl मायलेज देते.

आता मारुती सुझुकी त्यांच्या नवीन आगामी कॉम्पॅक्ट सेडान डिझायर आणि हॅचबॅक स्विफ्टमध्ये ही टेक्नॉलॉजी घेऊन येणार आहे, यानंतर स्विफ्ट आणि डिझायरला त्यांच्या परफॉर्मन्स पासून ते मायलेजपर्यंत बरेच फायदे मिळणार आहे.

40Km पर्यंत मिळणार मायलेज ?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्ट्रॉंग हायब्रिड टेक्नॉलॉजी ने सुसज्ज नवीन डिझायर आणि स्विफ्ट 40Kmpl पर्यंत मायलेज देऊ शकतात. स्ट्रॉंग हायब्रिड टेक्नॉलॉजी नंतर कार पेट्रोल आणि बॅटरीवर चालविली जाऊ शकते, ज्यामुळे मायलेजही वाढेल. सध्याची स्विफ्ट 22.56Kmpl प्रति लिटर पेट्रोलचे मायलेज देते, तर डिझायर 22.61Kmpl प्रति लिटर पेट्रोलचे मायलेज देते.

Leave A Reply

Your email address will not be published.