महाराष्ट्रातून समृद्धी, शक्तीपीठनंतर आता 457Km चा नवा एक्सप्रेस-वे! ‘या’ 3 जिल्ह्यातील गावांची यादी आली, पहा Road Map..
भारत इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये वेगाने प्रगती करीत आहे. त्याचेच एक पुढचे पाऊल म्हणून मध्य भारताला दक्षिणपूर्व भागाशी थेट जोडण्याच्या अनुषंगाने नागपूर ते विजयवाडा असा 457 किलोमीटरचा सुपरफास्ट महामार्ग तयार करण्याची योजना केंद्र शासनाने आखली आहे.
हा महामार्ग चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती आणि बल्लारपूर तालुक्यातून जाणार असून या मार्गावरील मातीचे परीक्षणही सुरू झाले होते.आता या रस्त्याप्रकरणी शासनाने अलीकडे अधिसूचना निर्गमित केली असून महामार्गाच्या अंतिम आखणीस अंतिम मान्यता प्रदान केली आहे. आणि यासंदर्भात जमिनीच्या अधिग्रहणासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ विभाग नागपूर यांच्याकडून चंद्रपूर जिल्ह्यातील संबंधित तहसील कार्यालयाकडून अहवाल मागितला आहे.
या 457 किलोमीटरच्या महामार्ग बांधकामावर 14 हजार 666 कोटी रुपये खर्च होणार आहे. नागपूर ते विजयवाडा इकॉनोमिक कॅडोअरचे काम एनएचएआय यांच्या देखरेखीखाली सुरू असून सर्व कामाचे डीपीआर झाले असल्याचे म्हटले जाते.
एनएचएआय द्वारे महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश राज्यातून संरेखित केलेला चार पदरी रस्ता राहणार आहे. या कॉरिडॉरचे बांधकाम (ब्राऊनफिल्ड अपग्रेड आणि ग्रीनफिल्डचे संयोजन) भारतमाला परियोजना फेज -1 कार्यक्रमांतर्गत मालवाहतुकीची कार्यक्षमता सुधारणे आणि बंदर कनेक्टिव्हिटीद्वारे निर्यातीला चालना देण्याचे प्राथमिक उद्दिष्ट ठेवून केले जात आहे.
नागपूर ते विजयवाडा हा थेट एक्सप्रेस हायवे तयार झाल्यानंतर 457 किलोमीटर अंतर केवळ पाच ते सहा तासात कापता येणार आहे. दरम्यान एनएचएआयने अद्याप प्रकल्पाचा तपशीलवार अहवाल (डीपीआर) ऑनलाइन उपलब्ध केलेला नाही.
असे असले तरी काही अभियंत्यांनी ही माहिती मर्जीतीतल्या राजकीय व्यक्तींमार्फत दलालांकडे पोहोचवून जमीन जाणाऱ्या संभाव्य शेतकऱ्यांच्या जमीन खरेदीसाठी प्रयत्नशील होते अलाइनमेंटबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती झाली आणि त्यांनी जमिनीचे व्यवहार थांबविले. यानंतरही दलाल आणि काही व्यक्ती सदर मार्गात जमिनी जाणाऱ्या संभाव्य शेतकऱ्यांच्या घरांचे उंबरठे जमीन खरेदीसाठी झिजवत होते. परंतु त्यात त्यांना यश आले नाही. हा आर्थिक कॉरिडॉर 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
हा महामार्ग चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती आणि पुढे बल्लारपूर या तालुक्यातून जाणार आहे. यात वरोरा तालुक्यातील बोडखा, मांडव गोराड चेक मकसुर, वनली, चेक कवडापूर, बोरगाव हिरापूर, लोणार (धोटे), सूमठाणा, पांढरतळा, पाचगाव, आसाळा, बांद्रा, सालोरी – खातोडा, परसोडा जामगाव खुर्द , जामगाव बुद्रुक..
यानंतर भद्रावती तालुक्यातील कोंढा, विजासन, चारगाव कुणाडा या भागातून जाणार आहे. यात वरोरा आणि चिमूर भागातील प्रवाशांकरिता सालोरीलगतच्या खातोडा येथे चढण्या- उतरण्याचा पॉइंट दिला जाणार असल्याचे सांगितले जाते.
हा एक्सप्रेस हायवे 2027 पर्यंत पूर्ण करायचा असल्याने 3 ऑक्टोबर 2023 पासून मार्गात येणाऱ्या वरोरा आणि भद्रावती तालुक्यातील गावातील संभाव्य जमिनीच्या माती परीक्षणाचे काम सुरू झाले होते. दरम्यान महाराष्ट्र शासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन निर्णय क्रमांक – खाक्षेस – 2023 / प्र.क्र. 368 रस्ते -8, दिनांक 27/12/2023 अन्वये नागपूर – चंद्रपूर प्रवेश नियंत्रित शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गाच्या अंतिम आखणीस महाराष्ट्र शासनाने मान्यता प्रदान केली आहे.
या अंतर्गत एकूण 194.397 कि.मी. रस्त्याचे बांधकाम केले जाणार आहे. या महामार्गाबाबत महाराष्ट्र महामार्ग अधिनियम 1955 चे कलम 3 अंतर्गत अधिसूचना 9 फेब्रुवारी 2024 रोजी प्रसिध्द करण्यात आली असून महामार्गास राज्य महामार्ग (विशेष) क्र. 09 म्हणून घोषीत करण्यात आला आहे.
त्या अनुषंगाने भूसंपादनाच्या कामकाजासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती, चंद्रपूर, बल्लारपूर तहसील कार्यालयास संबंधित गावाच्या जमिनीच्या आठ – अ, कृषक आणि अकृषक बाबतची माहिती सादर करण्याचे निर्देश नागपूर विभागाच्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी 23 फेब्रुवारी 2024 नुसार एका पत्राद्वारे दिले असल्याची विश्वसनीय माहिती आहे.
यात वरोरा तालुक्यातील बोडखा, आसाळा, चक मकसूर, बोरगाव देशपांडे, मकसूर, सालोरी, चक कवडापूर, पिजदूरा, सूमठाना, खातोडा, मांडवगु – हाड, वलनी वनग्राम, बोरगाव शिवनफळ, परसोडा, पांढरतळा, जामगाव बु., पाचगाव व जामगाव खु. या गावांचा समावेश असल्याचे सांगितले जाते. तसेच संभाव्य जागेतून जाणाऱ्या मार्गावर पांढऱ्या रंगाने चिन्ह करून त्यावर क्रमांक देणे सुरू झाले आहे.