10 वी पास विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरीची संधी । इंडिया पोस्ट विभागात 38,926 जागांसाठी डायरेक्ट भरती ; असा करा अर्ज…
शेतीशिवार टीम, 20 मे 2022 :- India Post GDS Recruitment 2022 : 10वी पास उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण इंडिया पोस्टने ग्रामीण डाक सेवक GDS भर्ती 2022 अधिसूचना जारी केली आहे. यावेळी इंडिया पोस्टने तब्बल 38,926 रिक्त पदांवर GDS भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित केले आहेत. त्यामुळे 10वी 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांचे सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण होणार आहे. इंडिया पोस्ट GSS भर्ती 2022 साठी अर्ज प्रक्रिया 2 मे पासून सुरू झाली आहे. पात्र उमेदवार इंडिया पोस्ट GSS भर्ती 2022 साठी ऑनलाइन अर्ज करू शकणार आहे.
इंडिया पोस्ट GSS भर्ती 2022 साठी इच्छुक उमेदवार 05 जून 2022 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. इंडिया पोस्ट GSS भर्ती 2022 मध्ये महत्वाच्या तारखा, पात्रता, निकष, पगार, निवड आणि अर्ज प्रक्रियेसह संपूर्ण डिटेल्स खाली दिलेली आहे. ती संपर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा..
इंडिया पोस्टने 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ग्रामीण डाक सेवक (GDS) भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. उमेदवार इंडिया पोस्ट GSS भर्ती 2022 साठी इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाइट indiapostgdsonline.gov.in वरून ऑनलाइन अर्ज करू शकतात. भारतातील विविध राज्यांमध्ये GDS भरतीसाठी 38926 पदे निश्चित आहेत. यामधील 3026 रिक्त जागा महाराष्ट्रातील आहे. शाखा पोस्टमास्टर (BPM), सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM) आणि डाक सेवक म्हणून उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
इंडिया पोस्ट GSS भर्ती 2022 डिटेल्स :-
इंडिया पोस्ट GDS भर्ती 2022 अर्ज सुरू करण्याची तारीख : 2 मे 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 जून 2022
नोकरीचे स्थान : भारत
शैक्षणिक पात्रता : माध्यमिक
एकूण रिक्त पदे : 38,926
इंडिया पोस्ट GSS भर्ती 2022 पगार :
BPM : Rs. 12000
ABPM / Dak Sevak : Rs.10000
भारत पोस्ट GDS 2022 : साठी पात्रता निकष शैक्षणिक पात्रता :-
उमेदवाराकडे भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही शालेय शिक्षण मंडळाकडून 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
उमेदवारांना स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे
सायकल चालविण्यास देखील सक्षम असणे आवश्यक आहे,
इंडिया पोस्ट GSS भर्ती 2022 वयोमर्यादा सामान्य श्रेणीतील उमेदवारांचे वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे.
तर आरक्षित प्रवर्गाला सरकारी नियमांनुसार वयात सवलत दिली जाईल. किमान वयोमर्यादा – 18 वर्षे कमाल वयोमर्यादा – 40 वर्षे
भारत पोस्ट GSS भर्ती 2022 निवड प्रक्रिया :-
उमेदवाराची पात्रता स्थिती आणि सबमिट केलेल्या पदांच्या पसंतीच्या आधारावर सिस्टीम जनरेट केलेल्या गुणवत्ता यादीनुसार निवड केली जाईल. हे नियमांनुसार सर्व पात्रता निकषांच्या पूर्ततेच्या अधीन असेल.
इयत्ता 10वी मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे निवड केली जाईल.
इंडिया पोस्ट GSS भर्ती 2022 अर्ज फी सामान्य श्रेणीतील उमेदवारांना फी म्हणून 100 रुपये भरावे लागतील.
तर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार अर्ज शुल्कात पूर्ण सूट दिली जाईल.
इंडिया पोस्ट GSS भर्ती 2022 साठी अर्ज कसा करावा ?
या पदांवर काम करण्यास इच्छुक उमेदवार अंतिम तारखेपूर्वी अधिकृत वेबसाइट https://indiapostgdsonline.in/ द्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
India Post GDS Recruitment 2022 Registration Apply Online link
India Post GDS Recruitment 2022 Notification PDF Download Link