Take a fresh look at your lifestyle.

Wah! Wah! महिंद्रा Scorpio N समोर सर्वच SUV होणार फेल ; लूक पाहून दिवाने व्हाल, पहा जबरदस्त फीचर्स अन् Teaser…

0

शेतीशिवार टीम, 21 मे 2022 :- Mahindra Scorpio N : महिंद्रा कंपनी आपली सर्वात जबरदस्त न्यू SUV Scorpio N 20 जून रोजी लॉन्च करणार आहे. दरम्यान, कंपनीने स्कॉर्पिओ लाइनच्या नवीन एडिशनचीही घोषणा केली आहे. कंपनीने टीझर (Teaser) जारी करून याबाबत माहिती दिली आहे.

हा टीझर 1.01 मिनिटांचा आहे. टीझरमध्ये स्कॉर्पिओ एन (Scorpio-N) दिसत आहे. याच्या शेवटी बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या आवाजात ‘मुबारक हो बाप हुआ है, नाम है इन, स्कॉर्पिओ इन’. टीझरमध्ये SUVचा ॲक्सटीरियर दिसत आहे. कंपनीने आपल्या टीझरमध्ये #BigDaddyOfSUV चा वापर केला आहे. कंपनीने आपल्या ऑफिशियल पेज ची लिंकही शेअर केली आहे.

Teaser मध्ये अशी दिसतीये महिंद्रा स्कॉर्पिओ Mahindra Scorpio N :-

कंपनीने Scorpio N मध्ये एकदम नवीन सिंगल ग्रिल दिली आहे. यामध्ये क्रोम फिनिशिंग दिसत आहे. कंपनीचा नवा लोगो ग्रिलवर दिसत आहे. त्यामुळे समोरचे सौंदर्य वाढते. यामध्ये पुन्हा डिझाइन केलेले एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, नवीन फॉग लॅम्प हाउसिंगसह पुन्हा डिझाइन केलेले फ्रंट बंपर, सी-आकाराचे एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स, हेक्सागोनल लोअर ग्रिल इन्सर्टसह वाइडर सेंट्रल एअर इनलेट यांचा समावेश आहे.

>> SUV ला टू-टोन व्हील्स चा नवीन डिझाइन केलेला सेट मिळतो. ॲक्सटीरियरच्या दुसऱ्या साईडला, क्रोम्ड डोअर हँडल, क्रोम विंडो लाइन्स, पावरफुल रूफ रेल्स, ट्वीक्ड बनेट आणि साइड-हिंग्ड डोअर्ससह बूटलिड, अपडेटेड रिअर बंपर, सर्व-नवीन वर्टिकल एलईडी टेल लॅम्प्स मिळतात.

लग्जरी आणि स्टाइलिश इंटीरियर मिळण्याची शक्यता…

स्कॉर्पिओची ॲक्सटीरियर साईड पाहता, इंटेरिअर देखील अतिशय आलिशान असेल असं समजतंय. नवीन डॅश आणि सेंटर कन्सोल, अपडेटेड सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंटेशन, फ्लॅट-बॉटम स्टीयरिंग व्हील, रूफ-माउंटेड स्पीकर, लेदर सीट्स, ॲडजस्टेबल हेडरेस्ट, वायरलेस चार्जिंग पॅड, सेंट्रली माउंट केलेले टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, इंजिन स्टार्ट / स्टॉप बटण, क्रूझ मिळण्याची अपेक्षा आहे. सुरक्षेसाठी, सनरूफ, 6 एअरबॅग्ज, रिव्हर्स कॅमेरा, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, क्रूझ कंट्रोल आणि रिअर डिस्क ब्रेक अशी अनेक फीचर्स उपलब्ध असण्याची शक्यता आहे.

फोर व्हील ड्राइव्हचा ऑप्शन मिळणे अपेक्षित….

2022 Mahindra Scorpio N मध्ये Thar आणि XUV700 चे इंजिन मिळू शकतं. हे 2.0-लीटर फोर-सिलेंडर mStallion पेट्रोल आणि 2.2-लीटर फोर-पॉट mHawk डिझेल इंजिनद्वारे समर्थित असेल. इंजिनला 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलं जाऊ शकतं. स्कॉर्पिओ N चे टॉप-एंड व्हेरियंट फोर-व्हील ड्राइव्ह (4WD) सिस्टिमशी जोडलं जाऊ शकतं…

Leave A Reply

Your email address will not be published.