Take a fresh look at your lifestyle.

Fortuner ला टक्कर देण्यासाठी ही नवी SUV आज भारतात झाली लॉन्च ; रांजणगाव MIDC त प्रॉडक्शन सुरू…

0

शेतीशिवार टीम, 20 मे 2022 :- जीप मेरिडियन एसयूव्ही (Jeep Meridian SUV) अखेर आज भारतात लॉन्च झाली आहे. तुम्ही नवीन मेरिडियन (Meridian) एसयूव्ही रु. 50,000 च्या किमतीत बुक करू शकता. कंपनी पुढील महिन्यात जूनच्या तिसऱ्या आठवड्यात या वाहनाची डिलिव्हरी सुरू करणार आहे. कंपनीने पुण्यातील रांजणगाव MIDC च्या फॅक्ट्रीमध्ये या SUV चे प्रॉडक्शन सुरू केलं आहे.

किंमत :-

जीप मेरिडियनची (Jeep Meridian SUV) किंमत 29.90 लाख रुपयांपासून सुरू होते. Jeep Meridian MT FWD ची किंमत रु. 29.90 लाख, Jeep Meridian (O) MT FWD ची किंमत रु. 32.40 लाख आणि Jeep Meridian 9AT FWD ची किंमत रु. 31.80 लाख आहे.

फीचर्स :-

मेरिडियनला (Meridian)10.25 – इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto सह 10.1-इंच टचस्क्रीन, वायरलेस चार्जिंग, पॉवर फ्रंट सीट्स, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, पॅनोरॅमिक सनरूफ, सहा एअरबॅग्ज, ट्रॅक्शन कंट्रोल, ESC, हिल स्टार्ट आणि डिसेंट कंट्रोल, 360 डिग्री पार्किंग कॅमेरा आणि सेलेक्टेबल ड्राइव्ह मोड…

मेरिडियनमध्ये (Meridian) मिडल-रो साठी बेंच सीट आणि थर्ड रो मध्ये जाण्यासाठी वन-टच टम्बल डाउन फंक्शनसह 7-सीटर ऑप्शन आहे. बेंच सीट्स ऐवजी मधल्या रांगेत कॅप्टन सीटसह 6 – सीटर व्हेरिएंट नंतर येण्याची अपेक्षा आहे.

इंजिन :-

जीप कंपासप्रमाणे, मेरिडियन 2.0-लिटर 4-सिलेंडर मल्टीजेट टर्बो – डिझेल इंजिन दिलं गेलं आहे. ट्रान्समिशनच्या बाबतीत, मेरिडियन 6-स्पीड मॅन्युअल किंवा 9- स्पीड ऑटो मॅटिक यूनिट ऑप्शन सह येतो. मॅन्युअल व्हेरिएंट केवळ FWD असणार आहे, ऑटोमॅटिकला AWD ऑप्शन देखील मिळणार आहे.

जीप लवकरच 1.3-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन आणण्याची योजना आखत आहे. आता लॉन्च झाल्यानंतर, जीप मेरिडियन सेगमेंटमधील स्कोडा कोडियाक, टोयोटा फॉर्च्युनर आणि एमजी ग्लोस्टर सारख्या लोकप्रिय वाहनांशी स्पर्धा करताना दिसून येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.