Take a fresh look at your lifestyle.

LPG Price Hike : सर्वसामान्यांना महागाईचा पुन्हा झटका । आजपासून घरगुती आणि व्यावसायिक दोन्ही LPG सिलिंडरमध्ये वाढ…

0

शेतीशिवार टीम,19 मे 2022 :- LPG Price Hike : मे महिन्यात LPG सिलिंडरच्या ग्राहकांना दुसरा मोठा झटका बसला आहे. घरगुती सिलिंडर (LPG Cylinder Price Today) पुन्हा एकदा महाग झाला आहे. तसेच, आजपासून म्हणजेच 19 मे 2022 पासून व्यावसायिक सिलिंडरच्या (Commercial cylinder) किमतीही वाढल्या आहेत.

या महिन्यात घरगुती सिलिंडरच्या दरात दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. 7 मे रोजी पहिल्यांदाच 50 रुपयांची वाढ करण्यात आली होती आणि आजही घरगुती LPG गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

पेट्रोल-डिझेलसोबतच खाण्यापिण्याच्या किमतीमुळे त्रस्त झालेले नागरिकही LPG च्या वाढत्या किमतीमुळे हैराण झाले आहेत. नुकतेच 7 मे रोजी घरगुती LPG सिलेंडर 50 रुपयांनी महागला. त्यामुळे देशातील बहुतांश शहरांमध्ये LPG सिलिंडरची किंमत 1000 रुपयांच्या पुढे गेली असली तरी दिल्ली – मुंबई मात्र मागे राहिली. आज घरगुती LPG सिलिंडरच्या दरात 3 रुपये 50 पैशांनी वाढ केल्यावर ही तफावत आता पुसली गेली.

आता संपूर्ण देशात घरगुती LPG सिलिंडर 1000 च्या पुढे आहे. गेल्या एका वर्षात दिल्लीत घरगुती LPG सिलिंडर 809 रुपयांवरून 1003 रुपयांवर गेला आहे. आजपासून, 14.2 किलोचा घरगुती LPG सिलेंडर दिल्ली आणि मुंबईमध्ये 1003 रुपयांना आणि कोलकात्यात 1029 रुपयांना आणि चेन्नईमध्ये 1018.5 रुपयांना मिळणार आहे.

व्यावसायिक सिलेंडरही खूप महागला…

7 मे रोजी LPGच्या दरात झालेल्या बदलामुळे जिथे घरगुती सिलिंडर 50 रुपयांनी महाग झाला, तिथे 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर सुमारे 10 रुपयांनी स्वस्त झाला. आज त्याचा दर 100 रुपयांनी वाढला आहे. आता 19 किलोचा सिलेंडर दिल्लीत 2354, कोलकात्यात 2454, मुंबईत 2306 आणि चेन्नईत 2507 रुपयांना विकला जात आहे.

1 मे रोजी त्यात सुमारे 100 रुपयांची वाढ झाली होती. तसेच, मार्चमध्ये दिल्लीत 19 किलोच्या LPG सिलिंडरची किंमत केवळ 2012 रुपये होती. 1 एप्रिलला ते 2253 वर आणि 1 मे रोजी 2355 रुपयांवर पोहोचले. गेल्या वर्षभरात व्यावसायिक सिलिंडरचे दर 750 रुपयांनी वाढले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.