शेतीशिवार टीम,18 मे 2022 :- TVS मोटर कंपनी (TVS Motor Company) ने आज बुधवारी आपली नवीन TVS iQube इलेक्ट्रिक स्कूटर तीन व्हेरियंटमध्ये लॉन्च केली आहे . कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही इलेक्ट्रिक स्कूटर एका पूर्ण चार्जवर 140KM च्या सर्वोत्तम ऑन-रोड रेंजसह येत आहे.

यासोबतच, या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये अनेक फीचर्स उपलब्ध आहेत. यात 7-इंचाची TFT टचस्क्रीन आणि क्लीन UI, इन्फिनिटी थीम पर्सनलायझेशन, व्हॉइस असिस्ट आणि TVS iCube Alexa Skillset, Intuitive Music Player Control, OTA अपडेट्स, प्लग-अँड-प्ले कॅरीसह फास्ट चार्जिंग, चार्जर, व्हायकल हेल्थ यांसारखे अनेक सेफ्टी नोटिफिकेशंस कनेक्ट केलेले फीचर्स मिळतात. ब्लूटूथ आणि क्लाउड कनेक्टिव्हिटी ऑप्शन, 32 लिटर स्टोरेज स्पेस आणि बरेच काही…

व्हेरियंट्स आणि कलर :-

TVS iQube सीरीज 3 व्हेरियंट / 11 कलर आणि 3 चार्जिंग ऑप्शन मध्ये उपलब्ध असणार आहे. ही ई-स्कूटर बेस व्हेरिएंट TVS iQube, मिड व्हेरिएंट TVS iQube S आणि टॉप व्हेरिएंट TVS iQube ST मध्ये लॉन्च करण्यात आली आहे.

बुकिंग झाली सुरू….

कंपनीने TVS iQube आणि TVS iQube S साठी बुकिंग सुरु केलं आहे. ही ई-स्कूटर खरेदी करू इच्छिणारे ग्राहक कंपनीच्या वेबसाइटवर बुक करू शकतात. या मॉडेल्सची डिलिव्हरी लगेच सुरू झाली आहे. या दोन्ही स्कूटर 33 शहरांमध्ये कंपनीच्या सध्याच्या डीलरशिपवर उपलब्ध आहेत. कंपनीचं म्हणणे आहे की, ते लवकरच 52 अतिरिक्त शहरांमध्ये देखील या उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सध्या, TVS iQube ST चे प्री-बुकिंग करता येते. कंपनी लवकरच TVS iQube ST चे बुकिंग आणि डिलिव्हरी सुरू करण्यासह इतर डिटेल्स काही दिवसातच शेअर करणार आहे.

टॉप व्हेरिएंट TVS iQube ST :-

TVS iQube ST च्या टॉप-ऑफ-द-लाइन व्हेरियंट TVS मोटरने डिझाइन केलेला 5.1 kWh बॅटरी पॅक मिळतो. स्कूटर एका पूर्ण चार्जवर 140KM ची सर्वोत्तम ऑन-रोड रेंज देते.

TVS iQube ST चार नवीन अल्ट्रा-प्रिमियम कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे आणि 1.5kW फास्ट-चार्जिंगसह येते. यात सीट्सखाली 32 लीटर स्टोरेज मिळतं जे दोन हेल्मेट आरामात सामावून घेऊ शकतं…

TVS iQube ST 5-वे जॉयस्टिक इंटरॅक्टिव्हिटी, म्युझिक कंट्रोल, व्हायकल हेल्थ, 4-G टेलिमॅटिक्स आणि OTA अपडेटसह प्रोअँक्टिव्ह नोटिफिकेशनसह इंटेलिजेंट राइड कनेक्टिव्हिटी सह यापूर्वी कधीही न पाहिलेली 7-इंच TFT टच स्क्रीन मिळतेय. या स्कूटरमध्ये तुमची आवडती थीम पर्सनलाइजेशन, व्हॉइस असिस्ट आणि TVS iQube Alexa (TVS iQube Alexa) सारखे फीचर्स देखील मिळतात…

TVS iQube S :-

TVS iQube S व्हेरियंट TVS मोटरने डिझाइन केलेली 3.4 kWh बॅटरी आहे. ही स्कूटर एका चार्जमध्ये 100KM ची ऑन रोड रेंज देते…

TVS iCube S ला 5-वे जॉयस्टिकसह 7-इंचाची TFT स्क्रीन मिळते ज्यामध्ये इंटरेक्शन, म्युझिक कंट्रोल, थीम पर्सनलाइजेशन, व्हायकल हेल्थसहित प्रोअँक्टिव नोटिफिकेशनसाठी 5-वे जॉयस्टिक देण्यात आली आहे.

TVS iQube :-

TVS iQube चे बेस व्हेरिएंट 3.4 kWh TVS मोटर डिझाइन केलेल्या बॅटरी फीचर्ससह येते. ही पूर्ण चार्ज केल्यावर व्यावहारिकरित्या 100KM ऑन-रोड रेंज देते. या स्कूटरमध्ये 5-इंच TFT टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन असिस्ट सारखे फीचर्स आहेत. TVS iQube चे बेस व्हेरियंट देखील तीन ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.

TVS SMARTXONNECTTM प्लॅटफॉर्मला सुधारित नेव्हिगेशन सिस्टीम, टेलीमॅटिक्स युनिट, अँटी-थेफ्ट आणि जिओफेन्सिंग फीचर्ससह अधिक वर्धित केलं आहे. व्हॉइस कमांडचा वापर करून, रायडरला TVS iCube Alexa स्किलसेटद्वारे महत्त्वाची माहिती ही मिळते.

रेंज आणि स्पीड :- 

स्कूटरचे बेस आणि S व्हेरियंट एका चार्जवर 100 KMची रेंज देतात. तर टॉप-ऑफ-द-लाइन (TVS iQube ST) व्हेरियंट 140 KMची रेंज देते. तिन्ही व्हेरियंटची ची रेंज आधीच्या मॉडेलपेक्षा जास्त आहे जी एका चार्जवर 75 किमीची रेंज देते. TVS iQube आणि TVS iQube S या दोन्हींचा टॉप स्पीड 78 kmph आहे. तर TVS iQube ST व्हेरियंटचा टॉप स्पीड 82 kmph आहे.

बॅटरी चार्जिंग :-

TVS iQube ST आणि TVS iQube S 950W आणि 650W क्षमतेसह प्लग – अँड – प्ले कॅरीसह ऑफ-बोर्ड चार्जर आणि 3 तास आणि 4.5 तास चार्जिंग टाइम ऑप्शन देखील उपलब्ध आहेत.

किती आहे किंमत :-

TVS iQube सीरीजची स्टार्टींग किंमत 98,564 रुपये आहे, जी 1,08,690 रुपयांपर्यंत जाते. TVS iQube ची किंमत 98,564 रुपये ठेवण्यात आली आहे. तसेच, TVS iQube S ची किंमत 1,08,690 रुपये निश्चित करण्यात आली आहे. या FAME आणि राज्य अनुदानासह दिल्लीच्या ऑन-रोड किमती आहेत. TVS iQube ST व्हेरियंटची किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नसून जाणकरांचा असा अंदाज आहे की, ST व्हेरियंटची किंमत 1,25,000 किंवा 1,35,000 हजार रुपयांच्या आसपास असू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *