कुक्कुट पालन अनुदानाकरता राज्यातील 302 तालुक्यांमध्ये राबवली जाणारी एक महत्वाची योजना म्हणजे सधन कुकुट विकास गटाची स्थापना. याच योजनेच्या नवीन अर्जाच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण अपडेट हाती आलं आहे. राज्यातील 302 तालुक्यांमध्ये पोल्ट्री डेव्हलपमेंट ब्लॉक अर्थात सधन कुकुट विकास गटाची स्थापना ही योजना राबवली जाते. या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना 5 लाख 13 हजार रुपये पर्यंत अनुदान दिलं जातं.

302 तालुक्यांमध्ये ही योजना राबवत असताना ज्या जिल्ह्यातील तालुक्यांकरता हे लक्षांक उपलब्ध होतील त्या – त्या जिल्ह्याकरता हे अर्ज मागवले जातात. सध्या बुलढाणा जिल्ह्याकरता अर्ज मागविण्यात आलेले आहेत, 10 जानेवारी 2020 पर्यंत इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज पंचायत समिती पशुसंवर्धन विभागाकडं सादर करावा अशा प्रकारचे आव्हान करण्यात आलं आहे.

नियम व अटी..

या योजनेच्या अंतर्गत सर्वसाधारण अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या ज्या लाभार्थ्यांकडे सद्यस्थितीमध्ये कुकुट पालन व्यवसाय आहे, किंवा लघु अंडी उबवणूक केंद्र आहे अशा स्वतः स्वयंरोजगार निर्मितीची आवड असणारे लघु उद्योजक सुद्धा याच्या अंतर्गत लाभार्थी म्हणून पात्र ठरतील.

यामध्ये महिलांना 30% आरक्षण असणार आहे.

या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 10 लाख 27 हजार 500 रुपये एवढा प्रकल्प खर्च ग्राह्य धरून 50% म्हणजे 5 लाख 13 हजार 750 रुपये एवढे अनुदान दिलं जातं.

यामध्ये अर्जदाराचे वय 18 पेक्षा कमी नसावं व 60 वर्षापेक्षा जास्तही नसावे.

लाभार्थ्याकडे 25 चौरस फुटाची जागा असावी याचप्रमाणे लाभार्थ्याकडे वीज, पाणी व दळणवळणाची उत्तम व्यवस्था असावी.

कमीत कमी तीन वर्ष हे कुकुट पालन करावे लागणार आहे. पक्षिगृहाचा उपयोग हा कुक्कुटपालन करण्यासाठी बंधनकारक असणार आहे. याचप्रमाणे लाभार्थ्याला पक्षीगृह बांधकाम, लघु अंडी उबवणूक यंत्र, याच्या खरेदी करता हे अनुदान दिले जाणार आहे. महत्वाचे म्हणजे हे अनुदान एकदाच दिले जाणार आहे. त्याच्यामुळे बँकेचे कर्ज वगैरे लाभार्थ्याला स्वतः बँकेकडून फेडावे लागणार आहे.

आवश्यक कागदपत्रे :-

फोटो आयडी
आधार कार्ड
ओळखपत्राची सत्यप्रत
फोटो आयडीची सत्यप्रत
बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित
7/12 व 8 अ चा उतारा
ग्रामपंचायत नमुना 4 ची उताऱ्याची नोंद

या सर्व कागदपत्रांसह कुकुट पालन व्यवसाय विषयक प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे व त्याच्या प्रमाणपत्राची छायांकित सत्यप्रत देखील आवश्यक आहे.

अनुसूचित जाती व जमातीचे लाभार्थी असतील तर त्याला जातीचा दाखला व याचबरोबर या अर्जासोबत इतर काही मागितलेली कागदपत्र जोडून हा अर्ज 10 जानेवारी 2023 पर्यंत लाभार्थ्यांना आपल्या पशु संवर्धन विभाग पंचायत समिती कार्यालय मध्ये जमा करावा लागणार आहे. या योजनेमार्फत ज्या ज्या जिल्ह्यांकरता लक्षांक उपलब्ध होतात त्या त्या जिल्ह्याकरता हे अर्ज मागवले जातात.

सध्या या योजनेअंतर्गत सन 2022-2023 करिता बुलढाणा जिल्ह्यातील तालुक्यांतील लाभार्थीींची निवड करावयाची आहे. या योजनेसाठी अर्ज करणेचा कालावधी हा दिनांक 28 डिसेंबर 2022 ते 10 जानेवारी 2023 असून इच्छूक लाभार्थीनी परिपूर्ण अर्ज भरुन संबंधित पंचायत समिती, पशुसंवर्धन विभागाकडे दि . 10 जानेवारी 2023 अखेर सादर करण्याची नोंद घ्यावी.

ज्या जिल्ह्यांचे अर्ज सुरु झाले नाहीत किंवा अधिक माहितीसाठी त्यांनी तालुका कृषी पशुसंवर्धन विभागाकडे संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *