जुलै महिन्यात महाराष्ट्रात बऱ्यापैकी पाऊस झाला. त्यामुळे राज्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पावसाचा जोर बराच कमी झाला आहे. ऑगस्टच्या सुरुवातीच्या आठवड्यात पावसाचा प्रभाव कमी होईल, असेही हवामान खात्याने सांगितले होते.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यानंतर आता पुन्हा पाऊस कधी येणार अशी चर्चा सुरू झाली आहे. जूनच्या उत्तरार्धात सुरू झालेल्या पावसाने संपूर्ण जुलैमध्ये उष्णतेपासून दिलासा दिला.
मात्र, आता पुन्हा एकदा 18 ऑगस्टनंतर महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यात लवकरच पाऊस परतेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. या आठवड्यात राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. (Maharashtra Rain Update)
राज्यभर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने पाऊस काही काळ थांबला होता. राज्यात लवकरच पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पालघर, रायगड, नवी मुंबईत ढगाळ वातावरण राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. दुसरीकडे, विदर्भ आणि कोकणातील बहुतांश भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पावसासाठी अनुकूल परिस्थिती..
15 ऑगस्टपासून राज्यात पावसाला अनुकूल परिस्थिती निर्माण होत असून हे वातावरण यापुढेही कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले. हवामान खात्याच्या माहितीनुसार, 20 ऑगस्टपर्यंत राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे.
मात्र, पश्चिम, मध्य आणि दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा जोर काही भागांत वाढता राहील. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 18 ते 24 ऑगस्ट दरम्यान पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार आहे. मराठवाड्यातही विविध भागात पावसाची शक्यता आहे.