न्यू जनरेशन स्विफ्ट आणि अपडेटेड eVX कॉन्सेप्टसह, सुझुकी 2023 च्या जपान मोबिलिटी शोमध्ये eWX मिनीचे प्रदर्शन करणार आहे. सुझुकी eWX ही मिनी इलेक्ट्रिक कार असून ती एका चार्जवर 230 किमी रेंज देणारी आहे चला या टॉल-बॉय इलेक्ट्रिक हॅचबॅककडे सविस्तर माहिती जाणून घेउया..

सुझुकी eWX डिझाइन आणि डायमेंशन..

सुझुकीचा दावा आहे की, eWX लोकांना दररोज वापरता यावी यासाठी डिझाइन केली आहे. त्याच्या डिझाइनबद्दल बोलायचे झाल्यास, eWX ची लांबी 3395mm, रुंदी 1475mm आणि उंची 1620mm आहे. ही 421 मिमी लांब, 30 मिमी अरुंद आणि एमजी कॉमेटपेक्षा 20 मिमी लहान आहे. परंतु, MG EV प्रमाणे, eWX ला C-आकाराचे LED DRL आणि बंपर, साइड स्कर्ट आणि अलॉय व्हील्सवर यलो हायलाइट्स मिळते.

eWX च्या रियर साईडच्या डिझाईनचा खुलासा..

सुझुकीने अद्याप eWX चे रियर साईडच्या डिझाईनचा खुलासा केला नाही आणि त्याचे इंटीरियर देखील हाईड ठेवलं गेले आहे. 25 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या जपान मोबिलिटी शोमध्ये अधिक डिटेल्स अपेक्षित आहेत.

सुझुकी eWX EV स्पेक्स आणि रेंज..

सुझुकीने अद्याप eWX च्या EV पॉवरट्रेन फीचर्सचा खुलासा केलेला नाही. परंतु, कार निर्मात्याचा दावा आहे की eWX पूर्ण चार्ज केल्यावर 230 किमीची रेंज देईल. ही रेंज MG कॉमेंट EV सारखीच आहे. त्यामुळे मारुती सुझुकी भारतीय बाजारपेठेत MG Comet EV विरुद्ध eWX सादर करेल अशी अपेक्षा आहे. शकतो. Suzuki eWX लाँच केल्यावर 40-60PS पॉवर आणि 100-150Nm टॉर्क जनरेट करेल अशी अपेक्षा करू शकतो..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *