Take a fresh look at your lifestyle.

Mumbai Metro: मेट्रो 2 अ व मेट्रो 7 वर रोज 3 लाखांहून अधिक प्रवासी ; पहा, रूट चार्ट, टाइम टेबल अन् तिकीट दर..

0

दहिसर ते डी. एन. नगर मेट्रो 2 अ आणि दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व मेट्रो 7 या दोन्ही मेट्रो मार्गिका शुक्रवारी सायंकाळी 4 वाजल्यापासून सर्वसामान्यांच्या सेवेत दाखल झाल्यानंतर 4 दिवसांत मेट्रोच्या प्रवासी संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून आले आहे.

रविवारी तब्बल 1 लाख 33 हजारांहून अधिक प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला होता. तर सोमवारी ही संख्या दीड लाखांच्या पार गेली आहे. शुक्रवार, 20 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी 4 च्या नंतर मेट्रोची वाहतूक सर्वसामान्यांसाठी सुरू केली असली तरीही पहिल्याच दिवशी 84 हजार 929 व शनिवार, 21 जानेवारी रोजी म्हणजेच दुसऱ्याच दिवशी रात्री 11 वाजेपर्यंत 1 लाख 29 हजार 476 प्रवासी तर रविवारी तिसऱ्या दिवशी 1 लाख 33 हजार 516 प्रवाशांनी प्रवास केला,

सोमवारी रात्री 8 वाजेपर्यंत सुमारे 1,17,352 मुंबईकरांनी मुंबई मेट्रो मार्ग 2 अ आणि 7 ने प्रवास केला. एमएमएमओपीएलने दिलेल्या माहितीनुसार प्रवासी संख्या मेट्रो 2 अ व मेट्रो 7 या दोन्ही मार्गिकांची मिळून असून सोमवारी दीड लाख प्रवाशांचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे.

वर्सोवा – अंधेरी घाटकोपर या पहिल्या मेट्रो मार्गिकेलाही सर्वसामान्यांनी सुरुवातीच्या दिवसात उत्तम प्रतिसाद दिला होता. अजूनही कार्यालयीन कर्मचाऱ्यांसह प्रवासी संख्येत वाढ होत आहे. असाच प्रतिसाद मेट्रो 2 अ व मेट्रो 7 या दोन्ही मामिर्गकांना मिळणार असून गुंदवली स्थानकातील जोडणी पुलामुळे प्रवास सुकर झाल्याचे दिसून आले आहे.

पहिली फेरी सकाळी..

डहाणूकरवाडी ते गुंदवली 5 वाजून 25 मिनिटांनी

डहाणूकरवाडी ते अंधेरी 5 वाजून 50 मिनिटांनी

अंधेरी ते गुंदवली 5 वाजून 55 मिनिटांनी

दहिसर पूर्व ते अंधेरी 6 वाजून 34 मिनिटांनी

दहिसर पूर्व ते गुंदवली 5 वाजून 43 मिनिटांनी

शेवटची फेरी रात्री.. 

अंधेरी येथून 9 वाजून 22 मिनिटांनी

गुंदवली ते अंधेरी 9 वाजून 22 मिनिटांनी

दहिसर पूर्व ते अंधेरी पश्चिम 9 वाजून 56 मिनिटांनी

दहिसर पूर्व ते गुंदावली 10 वाजता

अंधेरी पश्चिम ते दहिसर पूर्व 10 वाजून 09 मिनिटांनी

गुंदवली ते डहाणूकरवाडी 10 वाजून 9 मिनिटांनी

दहिसर पूर्व ते डहाणूकर वाडी 10 वाजून 50 मिनिटांनी

किती असणार तिकीट दर ?

अंतर (किमी) 0-3 3-12 12-18 18-24 24-30 30-36
भाडे (रुपये) 10 20 30 40 50 60
Leave A Reply

Your email address will not be published.