समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सर्वांना आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न साकारता यायला हवे यासाठी म्हाडाच्या माध्यमातून अधिकाधिक गृहनिर्मितीचे नियोजन करणार असल्याचे आश्वासन म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी दिले. ते म्हाडा कोकण मंडळाच्या माध्यमातून 5 हजार 311 घरांच्या अर्ज नोंदणी, विक्री व स्वीकृती प्रक्रियेच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.

यावेळेस म्हाडा कोकण मंडळाचे मुख्याधिकारी मारोती मोरे, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्याधिकारी अरुण डोंगरे, म्हाडा मुख्य अभियंता धीरजकुमार पंदिरकर व अन्य अधिकारी यावेळेस उपस्थित होते.

कोकण मंडळाच्या सोडतीमध्ये 1010 सदनिका पंतप्रधान आवास योजनेंतर्गत उपलब्ध करण्यात आले असून ही घरे 12 ते 15 लाखांपर्यंत मिळणार आहे, उर्वरित घरे ठाणे शहर, जिल्हा पालघर, रायगड, सिंधुदुर्ग येथील विविध योजनेंतर्गत उभारण्यात आली आहेत.

म्हाडाने ऑनलाइन सोडतीसाठी स्वीकारलेल्या IHLMS 2.0 या संगणकीय प्रणाली अंतर्गत घरबसल्या अर्ज नोंदणी, विक्री व स्वीकृती प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. म्हाडा हाऊसिंग लॉटरी सिस्टिम या मोबाईल ॲपमध्ये तर https://housing.mhada.gov.in संकेतस्थळावर अर्ज नोंदणी प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात येणार आली आहे.

कोकण मंडळाने जाहीर केलेल्या सदनिका विक्री सोडतीची लिंक 16 ऑक्टोबर रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत कार्यरत असणार आहे. त्यानंतर, सोडतीत सहभाग घेण्याची लिंक या प्रणालीवरून निष्क्रिय करण्यात येणार आहे. 18 ऑक्टोबर रोजी रात्री 11.59 पर्यंत अर्जदार अनामत रकमचा भरणा ऑनलाइन करू शकतील..

तसेच 18 ऑक्टोबर 2023 रोजी संबंधित बँकच्या कार्यालयीन वेळेपर्यंत अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येईल. अशा प्रकारे सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे अर्जदारच या प्रणालीद्वारे पात्र ठरवले जातील. सोडतीसाठी पात्र अर्जांची अंतिम यादी 3 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 6.00 वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.

तसेच प्रसिद्ध झालेल्या प्रारूप यादीवर अर्जदारांना 1 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत ऑनलाइन हरकती नोंदवता येणार आहेत. 9 नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी 11.00 वाजता पात्र अर्जाची संगणकीय सोडत जाहीर केली जाणार असून अर्जदारांना सोडतीचा निकाल तत्काळ मोबाईलवर एसएमएसद्वार , ई – मेलद्वारे तसेच ॲपवर प्राप्त होणार आहे.

एकात्मिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत 1037 सदनिका, सर्वसमावेशक योजने अंतर्गत 919 सदनिका, टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन यांच्यासाठी 67 सदनिका , तर कोकण मंडळाच्या प्रथम येणाऱ्याास प्रथम प्राधान्य योजने अंतर्गत विखुरलेल्या 2278 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून दण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *